AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives Trend: मोदींच्या समर्थनासाठी अख्खे बॉलीवूड, सलमान-अक्षयने म्हटले…

Boycott Maldives Trend | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालद्वीवमधील तीन मंत्र्यांनी टीका केली. त्याविरोधात भारतीयांनी बायकॉट मालदीव ट्रेंड सुरु केला आहे. मोदी यांच्या समर्थनार्थ बॉलीवूडमधील सितारेही उतरले आहे. त्यांनीही लक्षद्वीप पर्यटनास प्रोत्साहन देण्याची मोहीम सुरु केली.

Boycott Maldives Trend: मोदींच्या समर्थनासाठी अख्खे बॉलीवूड, सलमान-अक्षयने म्हटले...
| Updated on: Jan 08, 2024 | 9:49 AM
Share

मुंबई, दि. 8 जानेवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्य मालदीवला चांगलेच अंगलट येणार आहे. सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे. आतापर्यंत 8000 जणांना हॉटेल बुकींग रद्द केले आहे. 2300 फ्लाइट तिकीट रद्द करण्यात आले आहे. ही संख्या वाढतच आहे. केवळ सर्वसामान्य भारतीयच नाही तर अख्ये बॉलीवूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आले आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मालदीव ऐवजी लक्षदीपच्या पर्यटनाला जाण्याचे आवाहन केले आहे.

काय होता प्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याची चांगलीच चर्चा झाली. परंतु मालद्वीवला मिरच्या झोंबल्या. मालद्वीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर भारतीय उच्चायुक्तांकडून मालद्वीव सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. मालद्वीवनेही मोदींविरोधात टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना निलंबित केले. परंतु भारतीयांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली. यामध्ये बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर आणि जॉन अब्राहमसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले.

बॉलीवूडकडून पाठिंबा

जॉन अब्राहमने ट्वीट करत लिहिले, अद्भुत भारतीय आतिथ्य, “अतिथि देवो भव:” हे विचार आहे. लक्षद्वीप पर्यंटनासाठी सर्वात चांगली जागा आहे. सलमान खानने मोहिमेचे समर्थन करत लिहिले, लक्षद्वीपवरील सुंदर, स्वच्छ समुद्र किनारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून खूप आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आमच्या द्वीप आहे.

अक्षयकुमार याने म्हटले…

अक्षय कुमार याने म्हटले की मालद्वीवकडून भारतीय समुदायाविरोधात आक्षेपार्ह टीका केली गेली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मला धक्का बसला आहे आणि आश्चर्यही वाटले. आम्ही शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवतो. परंतु आपल्याला विनाकारण द्वेष सहन करावा लागत आहे. मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे. नेहमीच त्यांचे कौतुक केले आहे, परंतु आता सन्मान प्रथम आहे. चला #IndianIslands एक्सप्लोर करण्याचा आणि स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचे ठरवू या.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.