कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की; आमदार लव्हेकर, पटेल यांच्यात बाचाबाची

भाजप आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्ये थेट कोरोना सेंटरवरच बाचाबाची झाली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवर हा प्रकार घडला. (conflict between shiv sena and bjp workers at covid center in mumbai)

कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की; आमदार लव्हेकर, पटेल यांच्यात बाचाबाची
rajul patel
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 2:21 PM

मुंबई: भाजप आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्ये थेट कोरोना सेंटरवरच बाचाबाची झाली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवर हा प्रकार घडला. कोरोना लसीकरण सुरू असताना लस देण्यावरून दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या आमनेसामने आल्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि दोघींमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजपच्या महिला नेत्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (conflict between shiv sena and bjp workers at covid center in mumbai)

आज सकाळी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. भाजपच्या आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर आणि रंजना पाटील यांची शिवसेना नगरसेविका राजूल पटेल उपस्थित होते. सकाळी 11.30 च्या सुमारास लस देण्यावरून पटेल आणि लव्हेकर यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे भारती लव्हेकर या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहेत.

आरोप-प्रत्यारोप

राजूल पटेल आणि हारुन खान आदींनी आमच्या कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की केली. आमच्यावर हल्ले केले. कोविडच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून हल्ले होणं योग्य नाही, असं भारती लव्हेकर यांनी सांगितलं. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांवर शिवसेनेने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी लव्हेकर यांनी केली आहे. तर भाजपचे आमदार आणि नगरसेवक मनपाच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात, श्रेय लाटण्याचं काम करतात, असा आरोप सेना नगरसेविका राजूल पटेल यांनी केला आहे.

राज्यात 54 हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासांत 54022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 37386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4265326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 654788 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे. (conflict between shiv sena and bjp workers at covid center in mumbai)

संबंधित बातम्या:

Third Wave : कोरोनाची तिसरी लाट परतवण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, फॅमिली डॉक्टर्सबाबत मोठा निर्णय

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

Coronavirus : कोरोनाशी लढायचंय? तर ‘हे’ पदार्थ आहारात असायलाच हवेत, वाचा केंद्राच्या यादीत काय काय?

(conflict between shiv sena and bjp workers at covid center in mumbai)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.