Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पूनावालांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोलेंचा केंद्राला गंभीर सवाल

सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. (congress leader nana patole reaction adar poonawalla left india)

केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पूनावालांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोलेंचा केंद्राला गंभीर सवाल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 11:10 AM

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. त्यामागे काय दडलं आहे? असा सवाल करतानाच केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक अदर पूनावाला यांची रेकी करत आहेत काय?, असा गंभीर सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. (congress leader nana patole reaction adar poonawalla left india)

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. अदर पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावं. पूनावाला यांनी कुणालाही सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या मागे दडलंय काय? हे केंद्र सरकारने जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.

व्हॅक्सिनचे दोन दर का ठरवले

पूनावाला यांना केंद्र सरकारने न मागताच सुरक्षा पुरवली आहे. केंद्राचे सुरक्षा रक्षक त्यांची रेकी करत आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला. तसेच व्हॅक्सिनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचं राजकारण काय आहे? असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस सुरक्षेची जबाबदारी घेईल

दरम्यान, पूनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी व्हॅक्सिनेशनचं काम भारतात करावं, असं सांगातनाच पूनावाला यांच्यासोबत काँग्रेस असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असंही त्यांनी सांगितलं.

अदर पूनावाला काय म्हणाले?

अदर पूनावाला यांनी आंतरराष्ट्रीय मॅगेझीन टाईम्सला एक मुलाखत दिली आहे. त्यांनी यामध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे,” असं अदर पूनावाला यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, अदर पूनावाला यांची कंपनी राज्यातील पुण्यात लसनिर्मिती करत आहे. त्यामुळे अदर पूनावाला यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना धमक्या देणाऱ्या व्यक्तींमधील श्रीमंत व्यक्ती आणि देशातील काही राज्यांतील मंत्री हे नेमके कोण असावेत असे तर्क लावले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विटसुद्धा हाच संदेश देत असून लवकरात लवकर खरं काय आणि खोटं काय हे समोर आले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. (congress leader nana patole reaction adar poonawalla left india)

संबंधित बातम्या:

‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले

तुम्हाला लस किती रुपयात मिळणार? अदर पुनावालांनी 200 रुपयांचं गणित सांगितलं

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

(congress leader nana patole reaction adar poonawalla left india)

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.