लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची मोठी खेळी, राहुल गांधी पुन्हा देश पिंजून काढणार; आता लक्ष गुजरात ते…

मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यांचा सरकारी बंगलाही काढून घेण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची मोठी खेळी, राहुल गांधी पुन्हा देश पिंजून काढणार; आता लक्ष गुजरात ते...
rahul gandhi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 12:15 PM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : राहुल गांधी यांची संसदेत वापसी झाल्यानंतर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा एकदा देश पिंजून काढणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं होम टाऊन असलेल्या गुजरातपासून निघणार आहे. गुजरात ते मेघालय अशी ही यात्रा निघणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिलीय. राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या भारत जोडो यात्रेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्यावेळी राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढतील. त्याचवेळी महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रातही अशीच यात्रा काढणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अपयशी यात्रा

नाना पटोले यांच्या या घोषणेवर भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही अपयशी ठरलेली यात्रा होती. या यात्रेनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केली.

139 दिवस चालले

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी 7 सप्टेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा 12 राज्यातून गेली होती. या यात्रेची सांगता जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी 4 हजार किलोमीटर चालले होते. त्यासाठी त्यांना 136 दिवस लागले होते. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून ही यात्रा गेली होती.

पश्चिमेकडून पूर्वेकडे

राहुल गांधी यांची पहिली यात्रा दक्षिणेहून उत्तरेच्या दिशेने होती. तर दुसरी भारत यात्रा ही पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने असणार आहे. दरम्यान, ही यात्रा किती दिवस चालणार? किती तारखेपासून सुरू होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

खासदारकी बहाल

दरम्यान, मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यांचा सरकारी बंगलाही काढून घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षाच्या या शिक्षेला स्थगिती सुनावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना बंगलाही परत देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.