कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर

Congress, BJP and ShivSena : राज्यातील बॅनरवरमध्ये कल्याणमधील पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. परंतु त्यामागील कारणही वेगळेच आहे.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:26 PM

सुनील जाधव, डोंबिवली : बँनरवार राज्यातील राजकारणात सुरुच आहे. आता कल्याणमधील एक बॅनर चांगलेच चर्चेत आले आहे. कल्याणमध्ये चक्क काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहे. परंतु फडणवीस यांचे स्वागत काँग्रेसने करण्यामागे कारणही तसेच आहे. ‘कही पे निगाहे कहीपे निशाना’, असा हा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे येणारे-जाणारे लोकही या बॅनरची चर्चा करत असतात.

काँग्रेसने केल फडणवीस यांचे स्वागत

कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लवकरच आगमन होणार आहे. फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर काँग्रेसकडून लाववण्यात आले आहे. मात्र यावर येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही घेऊन या… असा संदेश लिहिण्यात आला आहे. काँग्रेसने या माध्यमातून बाळासाहेबांच्या सेनेला आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय.

आमदार भोईर यांनी घेतला काँग्रेसचा समाचार

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुपचूप कोण कोण भेटायला येत? यासंदर्भात थेट भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री हरवले नाहीत. त्यांच्याकडे दोन चार्ज आहेत. एक ठाणे जिल्हा आणि दुसरा सातारा. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला वेळ कमी दिला गेला असेल पण हरवले अस बोलणं योग्य नाही असे विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे लोकही येतात

मंत्री आहेत ते…कुठे जाणार आहेत? नियोजन समितीची बैठक असते तेव्हा ते भेटतच असतात. दोन चार्ज असल्यामुळे त्यांच्याकडून वेळ कमी दिला जातो हे मान्य आहे, असेही ते म्हणाले. जे लोक काम करतात त्यांच्यात उगाच लुडबुड करू नको, असा टोलाही विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ज्या लोकांचं ध्येय राज्याचा, मतदारसंघाचा विकास करणे आहे, अशा लोकांना डिवचून उपयोग नाही. उलट अशा लोकांकडून कामे करुन घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाचे माणूस आहेत. मी नेहमी बघतो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची माणसेही गुपचूप येत असतात अन् कामे करून घेतात. मग हा दुटप्पीपणा कशाला? असा सवालही भोईर यांनी उपस्थित केलाय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.