इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, राज्यभर 10 दिवस आंदोलनांचा धडाका : नाना पटोले

मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून 8 जुलैपासून (गुरुवार) दहा दिवस हे आंदोलन चालणार आहे.

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, राज्यभर 10 दिवस आंदोलनांचा धडाका : नाना पटोले
Nana Patole
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 5:47 PM

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील 7 वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून 8 जुलैपासून (गुरुवार) दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (Congress will protest against fuel price hike, 10 days protest across Maharashtra : Nana Patole)

येथील टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल 30 रुपये लीटर व डिझेल 22 रुपये लीटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी 100 रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्याविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करणार आहे.

महागाई विरोधातील या आंदोलनात उद्या गुरुवारी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरमध्ये मंत्री नितीन राऊत, सुनील केदार यांच्यासह सायकल यात्रा काढणार आहेत. तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयामध्ये काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे व सेलचे पदाधिकारी विविध आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कसा असेल काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम

8 जुलै (गुरुवार) :  सकाळी 11 वाजता सर्व विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदधिकारी व कार्यकर्ते पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईविरोधात सायकल यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर येथे सायकल यात्रा काढणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे हेही आंदोलनात सहभागी असतील.

कोकण विभाग : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान हे नवी मुंबई येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र विभाग : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल हे पुणे येथे आंदोलन करणार आहेत.

अमरावती विभाग : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील अमरावती येथे आंदोलन करणार आहेत

9 जुलै (शुक्रवार) : महिला काँग्रेसचे आंदोलन.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतील.

10 जुलै (शनिवार) : जिल्हा स्तरावर सायकल यात्रा महागाईविरोधात राज्यातील सर्व शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे.

11 जुलै (रविवार) : सह्यांची मोहिम.

11 जुलै ते 15 जुलैदरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एनएययूआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेंट व सेल यांनी राज्यातील प्रत्येक ब्लॉकमधील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवाली जाणार आहे.

सोमवार-मंगळवार (12-13 जुलै) : ब्लॉक तालुका पातळीवर सायकल यात्रा.

प्रत्येक ब्लॉक पातळीवर पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतींविरोधात किमान 5 किमी सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपांजवळ विसर्जित केली जाईल

12 ते 15 जुलै : ब्लॉक पातळीवर महिला काँग्रेस आंदोलन.

महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक पातळीवर एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात आंदोलन केले जाईल .

16 जुलै (शुक्रवार) : राज्य पातळीवर मुंबई येथे महागाईविरोधात सायकल यात्रा.

सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना कोव्हिड नियमांचे पालन करावे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाहन केले आहे.

इतर बातम्या

Bhagwat karad in cabinet: गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपद, वाचा भागवत कराड कोण आहेत?

‘सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाईल, ईडी, सीबीआयला याच कामासाठी ठेवलं’, हसन मुश्रीफांचा घणाघात

(Congress will protest against fuel price hike, 10 days protest across Maharashtra : Nana Patole)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.