लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा

लाडकी बहीण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री हा शब्द का काढला यावरुन आक्षेप घेतला. तर दादा हे याचा प्रचारच करत असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 7:28 PM

लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा झाल्याची माहिती सुत्राकंडून मिळाली आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचं नाव काढून दादाचा वादा असं श्रेय कसं घेतलं गेलं असं शिंदे गटातील मंत्र्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादा भूसे, दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन याचा कोणी एकाने श्रेय घ्यायचे नाही असे म्हटले आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना म्हटले की, प्रत्येकवेळी महायुतीत कोणतेही खटके उडू नयेत म्हणून आम्ही या भूमिकेत असतो. परतू पुन्हा पुन्हा तेच होत असेल, एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो. पण जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला हवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या सरकारचं यश आहे. सर्वजण मिळून करत आहोत पण मग एकच वादा, दादा का वादा हे का. पक्षाच्या कार्यक्रमात या घोषणा चालतात. आम्ही शिंदे साहेबांचा घोष करु. कोणी देवेंद्र फडणवीस यांचे करतील. याला आमचा विरोध नाही. पण एखादी योजना आम्ही आणली असं सांगणं इतरांना दुखावण्याचा प्रकार आहे. मी वारंवार सांगतोय. की आम्हाला महायुतीत कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.

‘काही लोकांचा हा अट्टाहास आहे. पण हा वाद जास्त प्रमाणात उद्भवला तर याचा त्रास सगळ्यांना होणार आहे.त्याची तयारी करावी लागेल. म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कुरबूर झाल्याचं कळतंय. विषय तोच आहे. आपल्याला मिळून सरकार चालवायचं आहे. वेगवेगळं केलं तर तुमच्यात एकवाक्यता कुठे आहे. मग कोण तुम्हाला उभे करेल. असं करता येणार नाही. दर वेळेला आम्ही सामंजस्याची भूमिका घेतोय. काही गडबड होऊ नये. प्रत्येक गोष्टीला आम्ही उत्तर द्यायचं मग त्यांनी द्यायचं हे आता थांबवलं पाहिजे. एकत्र पणे हातात हात घेऊन या योजना पुढे घेऊन गेल्या पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे.’ असं ही शिरसाठ म्हणाले.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन त्यांना मळमळ होतेय, उलटी होतेय असं घाणेरडं वक्तव्य करुन सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी त्यांना बोलवून आधी तानाजी सावंत यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केलं पाहिजे.तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या कार्यरक्त्यांना आणि नेत्यांचा अपमान केला. मंत्रिमंडळातील जबाबदार व्यक्ती असताना असं वक्तव्य करत असताना त्याच्यावर निर्णय घेण्याऐवजी राज्यात अजितदादा त्याचा प्रसार करत आहेत. योजना ते राज्यात पोहोचवत आहेत. त्यावर त्यांना जळजळ का होत आहे. असं उमेश पाटील यांनी केलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.