काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव का?; काँग्रेसचा शिवसेनेला थेट सवाल

फोर्टमधील काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. (Controversy over naming of Kala Ghoda junction, congress oppose)

काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव का?; काँग्रेसचा शिवसेनेला थेट सवाल
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 10:19 AM

मुंबई: फोर्टमधील काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. समजावादी पार्टीपाठोपाठ आता काँग्रेसनेही या नावाला विरोध केला आहे. मराठी नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने या चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव देण्यास मंजुरी का दिली? असा सवालच काँग्रेसने शिवसेनेला विचारला आहे. (Controversy over naming of Kala Ghoda junction, congress oppose)

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काळाघोडा परिसरातील चौकाल इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरिस यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावरून रवी राजा यांनी शिवसेनेला घेरलं आहे. पेरिस यांचं नाव या चौकाला देण्यासाठी 2018 रोजी प्रस्ताव देण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा प्रस्ताव आणला होता. काही दिवसातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहातही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नंतर या चौकात इस्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाने पाटीही लागली. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्या व्यक्तीचं काहीही योगदान नसताना मुंबईतील चौकाला या व्यक्तीचं नाव का? असा सवाल रवी राजा यांनी केला आहे.

नियमावली काय सांगते?

मूळ भारतीय नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव कसं चाललं? या नावाला शिवसेनेने मंजूरी का दिली? असा सवालही त्यांनी केला. महापालिकेच्या नियमावलीनुसार विदेशी व्यक्तीचे नाव रस्ते आणि चौकांना दिलं जाऊ शकत नाही. मग तरीही विदेशी व्यक्तीचं नाव या चौकाला का देण्यात आलं? असा सवाल विरोधक करत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सपाचा विरोध कशासाठी?

मुंबई पालिकेतील सपाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून इस्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाचा फलक हटवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. मी आपणांस सांगू इच्छितो की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधीचा अवमान करत चुकीच्या पद्धतीने चौकाचे नामकरण करण्याचा नवीन पायादंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केला आहे आणि हे अत्यंत खेदजनक आहे”, असं रईस शेख यांनी पत्रात म्हटलं आहे.

“मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्त्राईलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सभेमध्ये सन 2018 मध्ये आला होता. त्यावेळी तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी समाजवादी पक्ष तसेच इतर पक्षातील गटनेत्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मंजुर केला नाही. त्यानंतर पुन्हा सदर प्रस्ताव हा प्रभाग समितीमध्ये सादर करण्यात आला आणि त्याठिकाणी देखील अनेक नगरसेवकांनी जोरदार विरोध केल्यामुळे सदर विषयाचा प्रस्ताव नामंजूर झाला”, असं त्यांनी म्हटलंय. (Controversy over naming of Kala Ghoda junction, congress oppose)

आंदोलनाचा इशारा 

भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात सिमॉन पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे चौकाला नाव देणे योग्य नाही हे नामकरण झाल्यास कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कारण समाजवादी पक्षाने याबाबत प्रत्येक वेळी तीव्र विरोधक केला आहे आणि आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे ह्याप्रकारच्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या नामकरण फलकाविरोधात समाजवादी पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल”, असा इशाराही शेख यांनी दिला आहे. (Controversy over naming of Kala Ghoda junction, congress oppose)

संबंधित बातम्या:

‘काळाघोडा परिसरातील इस्राईलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाचा फलक हटवा’, समाजवादी पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुक्ताईनगरच्या मैदानात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे?

पालघर मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती होता-होता टळली, नालासोपाऱ्यात चोर समजून तीन महिलांना चोप

(Controversy over naming of Kala Ghoda junction, congress oppose)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.