AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona update – मुंबईकरांनो सावधान, आज राज्यात कोरोनाच्या नव्या 1357 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू, सर्वाधिक 889 रुग्ण मुंबईत

राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती असेल, तसेच कॉलेज, शाळा आणि हॉस्पिटलमध्येही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

Corona update - मुंबईकरांनो सावधान, आज राज्यात कोरोनाच्या नव्या 1357 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू, सर्वाधिक 889 रुग्ण मुंबईत
covid updateImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 6:13 PM
Share

मुंबई – कोरोनाची (Covid 19)रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 1357 नव्या रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 889 रुग्ण हे मुंबईतले आहेत. तर 104 रुग्ण हे नवी मुंबईत सापडले आहेत. ठाणे शहरात 91, तर ठाणे जिल्ह्यात 25 रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 68 आणि पुणे परिसरात 10 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, (Mumbai)नवी मुंबई, ठाणे आणि पुणे (Pune)या भागातच कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. मुंबईत आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा मृत्यूदर सध्या 1,87 टक्के इतका आहे.

पाच राज्यांना केंद्राचा इशारा

केंद्र सरकारने काल वाढत्या कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 5 राज्यांना पत्रे पाठवली आहेत, त्यात मुंबईचा समावेशही करण्यात आला आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. राज्य सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलत मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात पुन्हा मास्क सक्ती

राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती असेल, तसेच कॉलेज, शाळा आणि हॉस्पिटलमध्येही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.