लस साठ्याअभावी उद्या मुंबईत शासकीय, मनपा केंद्रांवर लसीकरण बंद
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई मनपा क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या लसीकरण बंद राहणार आहे.
मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (21 जुलै) लसीकरण बंद राहणार आहे. (Corona Vaccination closed at government and municipal centers in Mumbai on wednesday 21st july)
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सातत्याने महापालिका प्रशासनाला लसीकरण बंद ठेवावे लागत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 4 कोटी नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा (डोस) चार कोटींचा टप्पा पार केला आहे. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 93 लाख 25 हजार 362 इतकी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
12 ते 18 वर्षे वयाच्या मुलांच्या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Mumbai Vaccination | मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग
Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी
(Corona Vaccination closed at government and municipal centers in Mumbai on wednesday 21st july)