महामार्गाच्या कामावरून पुन्हा पत्रप्रपंच; आता नितीन गडकरींना पंकजा मुंडे लिहिणार पत्र
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्या सक्रिय बनल्या आहेत. त्यांनी आज ट्वीट करून पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भेगचा फोटो शेअर केला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर ‘लेटरबॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता रस्त्यांच्याच मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पत्र लिहिणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे. पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर (Paithan Pandharpur National Highway) भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे गडकरी-मुंडे यांच्यातील महामार्गाच्याच विषयावरून होणारा पत्रप्रपंचही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. (Correspondence from highway work again; Now Pankaja Munde will write a letter to Nitin Gadkari)
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्या सक्रिय बनल्या आहेत. त्यांनी आज ट्वीट करून पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भेगचा फोटो शेअर केला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या पत्रात नेमके काय म्हणणे मांडताहेत, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार आहे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. रस्त्याच्या बांधकामात झालेली चूक गडकरी यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते पत्र
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी राज्यातील महामार्गांच्या कामात स्थानिक शिवसेना नेते अडथळे आणत असल्याचा आरोप केला होता. त्या पत्रामध्ये त्यांनी रस्त्यांची यादीच सादर केली होती. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेना नेते आणि कार्यकर्ते अडथळ आणत आहेत. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे. यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. हे असेच सुरु राहिले तर राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही गडकरींनी दिला होता. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली होती. त्यांच्या पत्रानंतर शिवसेनेने स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर संबंधित वाद निवळला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गातील भली मोठ चूक निदर्शनास आणून देत याबाबत नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार असल्याचे जाहीर केले आहे. (Correspondence from highway work again; Now Pankaja Munde will write a letter to Nitin Gadkari)
पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तात्काळ दखल घेतली जाईल… pic.twitter.com/2Txjdc6hXa
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 19, 2021
इतर बातम्या
IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण
किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम ?