पँथर मनोज संसारे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार; वडाळ्यात शेकडो भीमसैनिक दाखल

मनोज संसारे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांना पक्षाघातही झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली.

पँथर मनोज संसारे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार; वडाळ्यात शेकडो भीमसैनिक दाखल
Manoj SansareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 11:28 AM

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पँथर, आक्रमक, प्रभावी वक्ता आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले होते. वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. संसारे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 च्या सुमारास दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. आपल्या लाडक्या आणि लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी कार्यकर्ते वडाळ्यातील कोरबा मिठागर येथे जमले आहेत.

मनोज संसारे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांना पक्षाघातही झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांचं शरीर उपचाराला प्रतिसादही देत नव्हतं. अखेर सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई सेंट्रल येथील बाबू जगजीवनराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तासभरात त्यांचं पार्थिव त्यांचं निवासस्थान असलेल्या वडाळ्यातील कोरबा मिठागर येथे आणलं जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

काहीवेळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर कोरबा मिठागर येथील म्युनिसिपल शाळेच्या मैदानात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. तिथूनच त्यांची अंत्ययात्रा निघेल. चैत्यभूमी येथेही अंत्ययात्रा आणली जाईल. त्यानंतर दादरच्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

प्रभावी वक्त्याला महाराष्ट्र मुकला

मनोज संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने तरूण नेतृत्व हरपलं आहे. संसारे यांच्या निधानावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेते नितीन राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शोक व्यक्त केला आहे. संसारे यांच्या निधनाने एका प्रभावी वक्त्याला आणि तरुण नेत्याला महाराष्ट्र मुकल्याची भावना सर्वच नेत्यांनी व्यक्त केली आहे.

दोनदा नगरसेवक

मनोज संसारे हे सुरुवातीला रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासोबत काम करत होते. ते विद्यार्थीदशेपासूनच रिपब्लिकन चळवळीत कार्यरत होते. प्रभावी वक्ते आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांनी अल्पावधीतच लौकीक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पँथर नेते भाई संगारे यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. भाई संगारे यांच्या निधानानंतर मनोज संसारे यांनी युथ रिपब्लिकन या पक्षाची स्थापना करून गावागावात पक्ष वाढवण्याचं काम सुरू केलं होतं. या कालावधीत ते दोनदा वडाळा पूर्व कोरबा मिठागरमधून दोनदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. एकदा त्यांची आईही नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

संसारे यांनी दोनदा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. या पक्ष उभारणीत त्यांना प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे यांची साथ लाभली होती. संसारे यांनी समाजातील कलावंताना एकत्र करण्याचेही प्रयत्न केले होते. कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते हिरहिरीने भाग घेत होते.

Non Stop LIVE Update
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.
मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून मराठा उमेदवारांना संधी
मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून मराठा उमेदवारांना संधी.
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 'या' 37 उमेदवारांना संधी, बघा संभाव्य यादी
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 'या' 37 उमेदवारांना संधी, बघा संभाव्य यादी.
सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद तर महायुतीत मावळच्या जागेवरून जुंपली
सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद तर महायुतीत मावळच्या जागेवरून जुंपली.
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?.