VIDEO : आता हेच राहिलं होतं… चक्क बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटील लचकत, मुरडत नाचली; व्हिडीओ तुफान व्हायरल
गौतमी पाटील आली... तिने जोरदार नृत्य केलं... कार्यक्रम यशस्वीही झाला... पण कुठेच धावपळ झाली नाही. लोकांची हुल्लडबाजी झाली नाही. पोलिसांना लाठीमार करावा लागला नाही. कारण कार्यक्रमाला एकही माणूस नव्हता.
पुणे : लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच असते. गौतमी शिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन बसतात. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. गौतमीही कोणताही कार्यक्रम नाकारत नाही. मग वाढदिवसाचा कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रम. मुळशीत तर गौतमी चक्क बैलासमोर नाचली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला होता. प्रचंड मोठ्या आणि मोकळ्या मैदानात हा स्टेज बांधला होता. या मैदानात लोकांची प्रचंड गर्दी होईल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटं. काय कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता. गौतमी पाटील आली, नाचली पण चक्क बैलासमोर असं पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं.
मात्र, गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकच पठ्ठ्या होत्या. तो म्हणजे बावऱ्या. बावऱ्या हा कोणी पुरुष वगैरे नाहीये… गावचा पाटील नाही की गावचा सरपंच नाही. ना आमदार, ना खासदार. तो होता चक्क एक बैल. या बावऱ्या बैलासमोर गौतमीने आपल्या लवाजम्यासह नृत्य केलं. तब्बल तास दोन तास गौतमीने या बैलासमोर आपली अदाकारी पेश केली. समोर प्रेक्षक नसतानाही गौतमी आणि तिचे सहकलाकार तितक्याच जोशात आणि जल्लोषात नृत्य करत होते. तर या बैलाच्या पाठी गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
हळदीच्या कार्यक्रमात धुरळा
पुणे तिथं काय उणे याचा प्रत्यय मुळशी तालुक्यात पाहायला मिळाला. मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात गौतमी पाटील हिच्या नृत्याची आणि बावऱ्या बैलाची चर्चा गाडा मालक शौकिनांमध्ये होती.
कोण आहे बावऱ्या
बावऱ्या बैल हा शर्यतीचा बैल आहे. या बावऱ्याने अनेक शर्यती गाजवल्या आहेत. गावचा सर्वात लाडका हा बैल आहे. मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वच गावकरी या बैलाची राखण करतात. त्याची देखभाल करतात. गावची शान असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक लोक येत असतात. त्यामुळे हा बैल नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळेच या बावऱ्या बैलासाठी थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.