AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या

6 डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानमित्त मुंबईत चैत्यभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यांचे वेळापत्रकही रेल्वे प्रशासनाने जारी केले आहे.

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 12:08 PM
Share

मुंबईः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त 6 डिसेंबरला दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरिता 8 उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

कोणत्या विशेष रेल्वेंची सुविधा?

– मेन लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल. – कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. – मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल. – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल. – हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. – पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल. – हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल. – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे चार वाजता पोहोचेल.

शताब्दी एक्सप्रेसमध्ये भोजन सुविधा

पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस ट्रेनमध्ये तयार केलेल्या जेवणासह तेथे खाद्य पदार्थांची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेसमध्ये 10 डिसेंबरपासून ऑन बोर्ड केटरिंग सेवा सुरु केली जात आहे. 10 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या ट्रेनच्या प्रवाशांना जेवणाचा पर्याय उपलब्ध आहे.

रविवारी मेगा ब्लॉक नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक नसेल. दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर या दिवशी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही. यंदादेखील गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या गर्दीचे विभाजन करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री वसई रोड ते विरार दरम्यान रात्रकालीन ब्लॉक गेतला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis: संजय राऊतांचे नेते बदलले; देवेंद्र फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे

VIDEO: यूपीए कुठे आहे? ममता बॅनर्जींच्या प्रश्नात दम, पण…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.