Sanjay Raut: दिल्ली महापालिका जिंकण्यासाठीच भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण, संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut: देशातील दोन प्रमुख शहरांसह अनेक शहरात दंगलीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. सत्ताधारी पक्षाकडून हे वातावरण केलं गेलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या राजधानीत दंगल होत आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे.
मुंबई: देशातील दोन प्रमुख शहरांसह अनेक शहरात दंगलीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. सत्ताधारी पक्षाकडून हे वातावरण केलं गेलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या राजधानीत दंगल होत आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे पालिकेचे निवडणूक येत आहे. आधी निवडणुका पुढे ढकल्या. आता दंगली घडवल्या. पालिका निवडणुका जिंकण्यासाठीच हे सुरू आहे. त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही. त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, असं शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. मुंबईत (mumbai) हाच तणाव सुरू केला आहे. कुणाला तरी पकडून हे काम केलं आहे. देशातील शहरात असे तणाव निर्माण कराल तर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. ती अजून ढासळेल. लोक आता कोव्हिडमधून बाहेर पडले आहेत. त्यात तुम्ही असं करत असाल तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही डबघाईला जाईल, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी प्रायोजित केलेले दंगे आहेत. रामनवमी, हनुमान जयंती वगैरे सण लोकांनी शांतपणे साजरे केले आहेत. त्यावेळी कधी दंगली झाल्या नाहीत. दिल्लीच्या कायदा सुव्यवस्था सरकारच्या हाती आहे. कारण पालिका निवडणुकांवर भाजपचं लक्ष आहे. पराभवाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता पालिका हातून जाणार लक्षात आल्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली, असं राऊत म्हणाले.
दंगली घडवून निवडणुका जिंकायच्यात
त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रोजगार व्यापर उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. लोकांच्या आता आता चुली पेटू लागल्या. उद्योगपती व्यापारी या संकटातून सावरत आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजपला देशाशी लोकांचं शेतकरी, कष्टकऱ्यांचं काही पडलं नाही. त्यांना दंगली घडवून राजकारण करून महापालिका जिंकायच्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आघाडी एकत्रच लढणार
आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. जिथे शक्य तिथे आम्ही एकत्र येऊन लढू. नांदेडमध्ये आम्ही जिंकलो. हा यशस्वी फॉर्म्युला झाला आहे. त्याची भीती वाटणाऱ्यांनी दंगलीची भीती निर्माण केली आहे, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: