महापौर दालनातून टेंडरच्या फायली गायब, पालिकेतील वाझे कोण?; भाजपची एसीबीकडे तक्रार
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून फायली गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मुंबई: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून फायली गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या सर्व टेंडरच्या फायली असून त्या गायब होण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहे का? असा सवाल भाजपने केला आहे. तसेच याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केल्याचं भाजपने म्हटलं आहे.
भाजपने हा धक्कादायक आरोप केला आहे. मलेरिया आणि डेंग्यूवरील उपाय योजनांसाठीच्या या टेंडर फायली असल्याचं मिहीर कोटेचा यांनी म्हटलं आहे. महापौरांच्या दालनातून या फायली गायब झाल्या आहेत. 14 महिन्यात 18 वेळी रिमाइंडर देण्यात आलं आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाने डोकं वर काढलं आहे. तरीही या फायलींबाबतची कार्यवाही झाली नाही. एवढया वेळा रिमाइंडर देऊनही महापौरांच्या ऑफिसमधून फाईल गायब झाल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचं भाजपनं स्पष्ट केलं.
आर्थिक कारणासाठी फाईल गायब?
मलेरिया आणि डेंग्युच्या टेंडरशी संबंधित या फायली होत्या. त्यामुळे या फाईल गायब होण्यामागे काही आर्थिक गणितं तर दडली नाहीत ना? आर्थिक गणितांची जुळवाजुळव किंवा देवाण-घेवाण न झाल्याने या फायली गायब करण्यात आल्यात का? असा सवाल करतानाच या फायली गायब करणारा महापालिकेती वाझे कोण? असा सवाल भाजपने केला आहे.
महापौर अडचणीत येणार?
आर्थिक कारणास्तव या फायली गायब झाल्या असाव्यात. त्या शिवाय या फायली गायब होऊच शकत नाही, असा आमचा संशय आहे. त्यामुळे एसीबीने तात्काळ या प्रकरणाचा तपास करायला हवा, असं भाजपने म्हटलं आहे. या प्रकरणी भाजप आज आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वात एसीबीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे डेंग्यु-मलेरियाच्या फायलीवरून महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फाईल गेली कुठे?
जी फाईल गायब झाली ती काही साधी सुधी फाईल नव्हत. तर कोट्यवधी रुपयांची वसुली करणारी होती. मलेरिया आणि डेंग्यूसाठी 2019 ला एक नवीन टेंडर काढण्यात आल होतं. महापौरांकडे ही फाईल गेली. पण फाईलच पुढे काय झाल याची माहिती नाही. एखादी फाईल महापौरांकडे जाते तेव्हा सही झाली नाही तर ती फाईल परत 15 दिवसात परत यावी असा नियम आहे. मात्र तसं झाल नाही. मग ही फाईल तुम्ही कशासाठी दाबली आणि नंतर ती फाईल गायब केली, असा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
तर कोर्टात जाणार
प्रत्येक विभागात वसुली सुरू आहे. मग इथे वसुली झाली नाही हे कशावरून? आम्ही एसबीला तक्रार दिली आहे. या फाईल गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच डेंग्यू आणि मलेरियामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना महापौरच जबाबदार आहेत. याप्रकरणी वेळेवर कारवाई झाली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षाला हायकोर्टात आव्हान देणार असंही कोटेचा यांनी सांगितलं.
VIDEO : महत्त्वाच्या घडामोडी | 30 November 2021 #FastNews #News pic.twitter.com/AQHCCsHufT
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2021
संबंधित बातम्या:
आ देखें ज़रा किसमें कितना है दम; नवाब मलिक यांचं प्रवीण दरेकरांना ओपन चॅलेंज
19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात