राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी, पडद्यामागे काय घडतंय?

अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. कारण ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या अनुपस्थितीबाबत माहिती देण्यात आलीय. पण राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु आहे.

राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 3:07 PM

अक्षय कुडकेलवार, Tv9 मराठी, मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेशोत्सवकाळात अनेकांनी त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बसलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून, बॉलिवूडचे अनेक मोठमोठे सिनेस्टार, याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बसलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. पण या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘वर्षा’ बंगल्यावर गेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्याबाबत आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये दगावलेल्या रुग्णांच्या प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दोन्ही घटनांचा आढावा घेतल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला प्रत्येक विभागाचे मंत्री उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आलीय.

अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर का?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत. अजित पवार हे सध्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आहेत. ते आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी?

अजित पवार हे आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी दोन महिन्यांपूर्वी अचानक सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचा भलामोठा गट अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्हती. त्यामुळे सुरुवातीलाच शिंदे गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी वाढत गेल्याची चर्चा आहे.

याच नाराजीतून अजित पवार गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले नाहीत. तसेच अजित पवार यांनी नाराजीतून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आहे. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले नाहीत. त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी या तीनही बड्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती. पण त्यानंतरही अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार कोणत्याही प्रशासकीय बैठकांना टाळत नाहीत. असं असताना ते आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.