पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची राजकारणात एंट्री? अजित पवार यांच्या शुभेच्छांच्या बॅनरमध्ये फोटो झळकला

पवार कुटुंबातील आणखी एका खास व्यक्तीची राजकारणात एंट्री झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चांना कारण ठरणारी गोष्ट घडली आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर या खास व्यक्तीचा फोटो आहे.

पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची राजकारणात एंट्री? अजित पवार यांच्या शुभेच्छांच्या बॅनरमध्ये फोटो झळकला
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 11:50 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्ताचा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींचा चांगला पाठिंबा आहे. तर शरद पवार यांचा याच गोष्टीला विरोध आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांसह मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची तीनवेळा भेटही घेतली आहे. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या इतर नेत्यांकडून देखील शरद पवार यांना भाजपसोबत येण्यासाठी विनंती केली जात आहे. असं असताना आता पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती राजकणारणात एंट्री मारण्याचे संकेत दिसत आहेत.

राज्यात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. असं असताना आता अजित पवार यांच्याकडून पवार कुटुंबातील एका स्पेशल व्यक्तीला राजकारणात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

याआधी पार्थ पवार यांना मिळालीय संधी

विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची संधी दिली होती. पण त्यावेळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी मावळ मतदारसंघातील अनेक घडामोडी चर्चेला कारण ठरल्या होत्या. प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या होत्या. या घटनानंतर आता आगामी लोकसभा निवडणूक येण्याआधी पवार कुटुंबातील आणखी एका स्पेशल व्यक्तीचा राजकारणात प्रत्यक्षपणे प्रवेश होऊ शकतो.

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांची राजकारणात एंट्री झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. कारण पक्षाचे मुंबई सचिव गणेश आडिवरेकर यांनी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये जय पवार यांचा फोटो दिसतोय. अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये जय पवार यांचा फोटो आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची चर्चा होऊ लागली आहे. तसं खरंच ठरलं तर आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत जय पवार यांना खरंच उमेदवारीची संधी मिळते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

रोहित पवारांनी संधीचं सोनं केलं

विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील रोहित पवार यांना संधी मिळाली होती. त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. रोहित पवार यांनी त्यावेळी मंत्री असलेले राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे रोहित पवार यांनी संधीचं सोनं केलं, अशी त्यावेळी चर्चा सुरु झालेली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.