Sindhudurg District Bank Election Result : ‘पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली’

सिंधुदुर्ग जिल्हा बँक(Sindhudurg District Bank)वर नारायण राणें(Narayan Rane)चं वर्चस्व पाहायला मिळालंय. त्यानंतर आता राणे समर्थक आणि भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राणेंचं अभिनंदन केलंय.

Sindhudurg District Bank Election Result : 'पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली'
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:36 PM

सिंधुदुर्ग/मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक(Sindhudurg District Bank)वर नारायण राणें(Narayan Rane)चं वर्चस्व पाहायला मिळालंय. त्यानंतर आता राणे समर्थक आणि भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, नितेश राणे (Nitesh Rane)आगे बढो, हम तुम्हारे साथ है, खणखणीत नाणे, नारायण राणे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यात. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राणेंचं अभिनंदन केलंय. पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून लोकशाही निवडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

ट्विट करत केलं अभिनंदन

नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांचं मन:पूर्वक अभिनंदन करत असल्याचं फडणवीस म्हणालेत. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते, विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! अशाप्रकारचं ट्विट त्यांनी या विजयानंतर केलंय.

कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणाबाजी

आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, नितेश राणे (Nitesh Rane)आगे बढो, हम तुम्हारे साथ है, खणखणीत नाणे, नारायण राणे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी या विजयानंतर दिल्यात.

कुणाच्या पारड्यात किती मतं?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणेंची प्रतिक्रिया

मागच्या दोन दिवसांपासून नितेश राणे गायब आहेत. मात्र आज त्यांनी एक फेसबूक पोस्ट करून विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर गाडलाच असं लिहिलं आहे.

Sindhudurg Bank Election Result | ‘राणें’चा विजय, पण भाजप उमेदवार पराभूत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील interesting निकाल

पुण्यात आज ‘जंगली महाराज रोड’, ‘फर्ग्युसन रोड’, ‘महात्मा गांधी रोडवर ‘नो व्हेईकल झोन’

शेवटी आईच काळीज ! मुलाला वाचवण्यासाठी आई झाली सुपर मॉम, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.