वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच राठोडांवर कारवाई नाही, चौकशी अधिकाऱ्याला निलंबित करा: देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (devendra fadnavis demand suspend police inspector in pooja chavan suicide case)

वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच राठोडांवर कारवाई नाही, चौकशी अधिकाऱ्याला निलंबित करा: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 2:17 PM

मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणातील ऑडिओ क्लिप, फोटो आणि 100 नंबरवरील कॉल्सचे डिटेल्स असतानाही वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्याबद्दल मी राठोड यांना दोष देणार नाही, वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केली. तसेच पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. (devendra fadnavis demand suspend police inspector in pooja chavan suicide case)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लिप आहे. संभाषण आहे. फोटो आहेत. 100 नंबरवरचे कॉल रेकॉर्ड आहेत. तरीही राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर मी राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. वरिष्ठांच्या आशीर्वादामुळेच मंत्री राजीनामे देत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

पोलीस निरीक्षकाला निलंबित करा

पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचे फोटो आणि ऑडिओ क्लिपही आहेत. पण तरीही कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही हे आश्चर्य आहे. ज्या महाराष्ट्र पोलिसांचं नाव संपूर्ण देशात घेतलं जातं त्या पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधीच पाहिली नव्हती, असं सांगतानाच पुण्याचे पीआय… जे पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यांना निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली. पुरावे असतानाही कारवाई न करणाऱ्या या अधिकाऱ्याला नोकरीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असंही ते म्हणाले.

नव्या कायद्याने मंत्र्यांना लैंगिक स्वैराचाराचा अधिकार दिला काय?

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का? असा सवाल करतानाच राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला. (devendra fadnavis demand suspend police inspector in pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

संजय राठोड पत्नी आणि मेव्हण्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार; कॅबिनेटपूर्वीच मोठा निर्णय होणार?

… तर राठोड यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा; पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल जाणार

…तोपर्यंत मागे हटणार नाही, तक्रारीमध्ये संजय राठोड यांचेही नाव; पूजा चव्हाणची आजी आक्रमक

(devendra fadnavis demand suspend police inspector in pooja chavan suicide case)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.