पंतप्रधान मोदी यांच्या नावाने योजना; मोदी आवास योजनेतून 10 लाख घरे बांधणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी घरकूल योजनांवर भर दिला. तसेच काही उपेक्षित घटकांच्या विकासासाठी त्यांनी महामंडळांचीही घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने योजना; मोदी आवास योजनेतून 10 लाख घरे बांधणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 3:03 PM

मुंबई : राज्याचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवी घरकूल योजना जाहीर केली आहे. मोदी आवास घरकूल योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून तीन वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेतून दरवर्षी 3 लाख घरे बांधली जातील. त्यासाठी दरवर्षी 3600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. इतर मागासवर्गीयांना या घरकूल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी घरकूल योजनांवर भर दिला. तसेच काही उपेक्षित घटकांच्या विकासासाठी त्यांनी महामंडळांचीही घोषणा केली आहे. फडणवीस यांनीयावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. त्यात इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या शिवाय प्रधानंत्री आवास योजनेतून 4 लाख घरे बांधण्यात येणार आहे. यात 2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमातीसाठी असतील तर 1.5 लाख इतर प्रवर्गांसाठी असणार आहे. याशिवाय रमाई आवास योजने अंतर्गत 1.5 लाख घरे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी बांधण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय शबरी, पारधी, आदिम आवास योजनेअंतर्गत 1 लाख घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमार्फत 50,000 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 600 कोटी रुपये खर्च होणार आहे. यात 25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी तर धनगर समाजासाठी 25,000 घरे बांधण्यात येणार आहे.

नवीन महामंडळांची स्थापना

फडणवीस यांनी यावेळी विविध समाज घटकांच्या विकासासाठी महामंडळांची घोषणा केली आहे. असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार देण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजाच्या विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ आदी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत येणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधींची तरतूद करण्यात आली आहे.

विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार

वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.