ललित पाटील प्रकरणात राजकारण्यांचा हात?; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी आमदार अपात्रतेपासून ते ड्रग्स प्रकरणापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं. तसेच कालच्या व्हायरल झालेल्या मी पुन्हा येईल या व्हिडीओवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असा निर्वाळाही त्यांनी दिलाय.

ललित पाटील प्रकरणात राजकारण्यांचा हात?; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 7:31 PM

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याने नाशिकमध्ये ड्रग्स सप्लाय करण्याची फॅक्ट्रीच स्थापन केली होती. याच फॅक्ट्रीतून राज्यात ड्रग्सचा पुरवठा केला जात होता. ललित पाटील याला कामात अनेक राजकीय नेत्यांची मदत होत असल्याचा आरोप होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहे. या प्रकरणावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ललित पाटील प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही हेच त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्ल्युसिव्ह मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी थेट आणि बेधडक उत्तरं दिली. काही लोकांनी ललित पाटील याला निश्चितच मदत केलीय. ही प्राथमिक माहिती आहे. मी गृहमंत्री आहे. त्यामुळे मी माहिती घेऊनच बोलेल. धागेदोरे असेल तर थेटपणे सांगेल. उचलली जीभ लावली टाळ्याला करायला मी यांच्या प्रवक्त्या सारखा नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.

कस्टडी का मागितली नाही?

या प्रकरणातील धागेदोरे बाहेर येणारच आहे. उद्या उठायचं कुणाचं नाव सांगायचं हे योग्य नाही. विरोधकांनी ज्या मंत्र्यांची नावे घेतली त्याबाबत यांच्याकडे काय पुरावं आहेत? ललित पाटीलला अटक झाली. तो शिवसेनेचा नाशिकचा प्रमुख होता. त्याला पूर्वी 14 दिवसाची पोलीस कोठडी होती. तो 14 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. ड्रग्स प्रकरणातील ही पहिलीच केस असेल त्याची चौकशीच झाली नाही. एखादा आरोपी 14 दिवस पूर्णवेळ अॅडमिट असेल तर कोर्ट तुम्हाला कस्टडी वाढवून देते. ललित पाटील प्रकरणात कस्टडी का मागितली नाही? ही सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला.

पोलिसांना डिसमिस करणार

आम्ही आता या ड्रग्स माफियांवर कारवाई सुरू केली आहे. कुणालाही सोडलं जाणार नाही. एकालाही सोडणार नाही. मी पक्का निर्णय केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. जे पोलीसवाले ड्रग्स प्रकरणात गुंतलेले दिसतील त्यांना तर सस्पेन्ड करणारच. कायद्याने ते करावेच लागते. पण आता यापुढे त्यांना डिसमिस करणार आहोत, अशी घोषणाच त्यांनी केली.

ड्रग्स फ्री महाराष्ट्र

देशात ड्रग्सचा प्रादुर्भाव गेल्या 15 ते 20 वर्षात वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यातील डिजींशी चर्चा केली. त्यांना अँटीड्रग्स कमिटी स्थापन करायला सांगितलं. त्यामुळे या समित्या स्थापन झाल्या आहेत. मीही क्राईम कॉन्फरन्स घेतली. पोलीस दलाला सिंगल पॉइंट अजेंडा दिला. ड्रग्स फ्री महाराष्ट्र करा म्हणून सांगितलं. डीआयआरकडून माहिती यायला लागली. त्यामुळे आम्ही ड्रग्स माफिया पकडायला लागलो आहोत, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.