Rajya Sabha Election : राज्यसभेला मुन्ना महाडिकांना कसं निवडून आणणार? फडणवीसांनी ‘तिसरं’ गणित सांगितलं

Rajya Sabha Election : आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धिने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Rajya Sabha Election : राज्यसभेला मुन्ना महाडिकांना कसं निवडून आणणार? फडणवीसांनी 'तिसरं' गणित सांगितलं
राज्यसभेला मुन्ना महाडिकांना कसं निवडून आणणार? फडणवीसांनी 'तिसरं' गणित सांगितलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:29 PM

मुंबई: भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha) तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. भाजपने (bjp) धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाडिक हे कोल्हापूरचे आहेत. माजी खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा सामना कोल्हापूरच्याच शिवसेनेच्या संजय पवारांशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय (मुन्ना) महाडिक यांना कसं निवडून आणणार याचं गणितचं मीडियासमोर मांडलं. मात्र, हे सांगत असताना भाजपचे पत्ते ओपन करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच आमचे तिन्ही लोक निवडून येतील असा दावाही त्यांनी केला.

गणित काय?

आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धिने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या तिन्ही जागा राज्यसभेत होत्या. त्यामुळे आम्ही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांनीही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांना जर घोडेबाजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी आपला एक उमेदवार मागे घ्यावा, असं सांगतानाच आम्ही घोडेबाजार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी आम्ही महाडिक यांना मैदानात उभे केले आहे. त्याचा आम्ही काही तरी विचार केला असेलच ना… काही तरी स्टॅटेजी ठरवली असेलच ना. पण ही स्टॅटेजी आम्हाला उघड करायची नाहीये, असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

11 मतांचं गणित जुळवण्यात आलं

धनंजय महाडिक यांनी तिसऱ्या जागेसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपच्या तिन्ही जगा सहज निवडून येतील असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. 31 मतं भाजपकडे असून उर्वरीत 11 मतांच गणित जुळवण्यात आलं आहे. काहीं अपक्ष आमदारांशी मी स्वतः बोलत आहे. पण भाजप पक्षश्रेष्ठींचीही बोलणी झाली आहे, असं महाडिक यांनी सांगितलं.

विजय आमचाच होणार

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपच्या तिसऱ्या उमेदवारीवर टीका केली होती. संभाजी छत्रपती यांना कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत होते ते यातून स्पष्ट होतंय. त्यांना यात स्वतःचा उमेदवार टाकायचा होता व त्यांना घोडेबाजार करायचा होता. यामुळे संभाजीराजेंची भाजपकडून ढाल करण्यात आली. आपल्याकडे लोकशाही आहे व प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारच सुद्धा बारीक लक्ष आहे या सगळ्या घडामोडींवर. आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे. आमचा उमेदवार विजयी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनाही खात्री आहे. उमेदवार निवडून येतील एवढी मते आमच्याकडे आहेत, असं राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.