VIDEO: नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडवला. काँग्रेसच्या आंदोलनाचा फियास्को उडाल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात.
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडवला. काँग्रेसच्या आंदोलनाचा फियास्को उडाल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करतील. पंतप्रधान मोदींनी (pm narendra modi) माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात जोडून आभारही मानले.
काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण मोर्चा फडणवीसांच्या घरापर्यंत येऊ शकला नाही. काँग्रेसने पटोले यांच्या नेतृत्वात काही काळ रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतल असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर फडणवीस यांनी बंगल्याबाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पटोले यांच्याव नौटंकीबाज म्हणून टीका केली. तर मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही स्पष्ट केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा भाजपने दिल्या. यावेळी आमदार आशिष शेलार, राजहंस सिंह, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, राम कदम, मनिषा चौधरी, कृपाशंकर सिंह आणि खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित होते.
लोंढे एकटे आले, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
दरम्यान, काँग्रेसचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे एकटेच सागर निवासस्थानाकडे आले होते. यावेळी सागर निवासस्थानात घुसत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी लोंढे यांचे हात तोंड दाबून, पाठीमागून धरत अक्षरशः ओढत गाडीत बसवलं. पोलिसांनी तोंड दाबलेले असतानाही लोंढे यांची घोषणाबाजी सुरू होती. महाराष्ट्र द्रोही भाजपचा निषेध असो अशा घोषणा लोंढे बेंबीच्या देठापासून देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान भाजपनं केल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. दोन पोलिसांनी लोंढे यांना अक्षरशः फरफटतच गाडीत बसवलं. मात्र अशाही परिस्थितीत लोंढे हे महाराष्ट्राद्वेष्ट्या भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देताना दिसलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काँग्रेसकडून सध्या निषेध आंदोलन सुरु आहेत. यात काल प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंचा एकेरी उल्लेख केल्यानं वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सागर बंगला आणि लक्ष्मी निवासस्थानीही मोठा पोलिस फौजफाटा सकाळपासूनच तैनात करण्यात आलाय.
संबंधित बातम्या: