Devendra Fadnavis : मंचावर दाखल होताच नरेंद्र मोदी यांच्या समोरच फडणवीस यांनी ‘ती’ उद्विग्नता बोलून दाखवली

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आपली उद्विग्नता बोलून दाखवली.

Devendra Fadnavis : मंचावर दाखल होताच नरेंद्र मोदी यांच्या समोरच फडणवीस यांनी 'ती' उद्विग्नता बोलून दाखवली
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 5:46 PM

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आज सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईत (Mumbai) आज तब्बल 38 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन होतंय. या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी दुपारी साडेचार वाजता मुंबईत दाखल झाले आणि सव्वा पाचच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपलं मनोगत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत आपली उद्विग्नता बोलून दाखवली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. सर्व नागरिकांचं स्वागत करतो. महाराष्ट्र आणि मुंबईच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक प्रेम मुंबईकरांनी दिलंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली

‘एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं’

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होतं की पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी डबल इंजिनचं सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार नाही बनू शकलं. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे तयार झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आपण आज अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहोत. राजकारण कसं असतं? कोविड काळात पंतप्रधान मोदींनी रस्त्यावर ठेला लावणाऱ्यांचा विचार केला. पण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यांनी गरिबांसाठी जी योजाना आणली ती योजना स्थगित केली. आम्ही आमचं सरकार आणल्यानंतर मुंबईतील १ लाख ठेला लावणारे, फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना त्याचा फायदा होईल. मुंबईसह इतर ठिकाणीही ते होईल”, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमात एका लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेची बिगुल समजला जात आहे. यामुळे बीकेसीत नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणातून मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट व भाजपने जोरदार तयारी सुरु केली. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांना आणले गेले. त्यासाठी अनेक जिल्ह्यातून खाजगी वाहनांनी कार्यकर्ते दाखल झाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.