Dhanajay Munde: रेणू शर्माच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंना ब्रेन स्ट्रोकचा दावा, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात खळबळजनक माहिती
13 ते 16 एप्रिलच्या काळात त्यांना मुंबईतील बीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, धनंजय मुंडे यांना तणावामुळे ब्रेन स्ट्रोक आला होता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांचा छळ केल्याप्रकरणी रेणू शर्माच्या (Renu Sharma)विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे मानसिक तमावात होते, त्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक (Brain stroke)आला होता, असा उल्लेख मुंबई पोलिसांनी दाखल केलल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. मुंबई पोलसांनी दोन दिवसांपूर्वी हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे. रेमू शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे मानसिक तणावात होते. त्यानंतर 13 ते 16 एप्रिलच्या काळात त्यांना मुंबईतील बीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, धनंजय मुंडे यांना तणावामुळे ब्रेन स्ट्रोक आला होता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रेणू शर्माच्या खात्यात अनेक व्यवहार झाल्याचेही उघड
रेणू शर्माच्या खात्यात मोठ्या रक्कमांचे व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. यात धनंजय मुंडे यांनीही तिला 50 लाख रुपये आणि आयफोन पाठवला होता, असा उल्लेखही आरोपपत्रात करण्यात आला आहे. यासह इतरही अनेक व्यवहार झाल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात 20 एप्रिल रोजी रेणू शर्मा हिला मध्य प्रदेशात इंदूरमधून अटक करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे? सोप्या शब्दांत समजून घ्या!
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला. इंटरनॅशनल कॉल करुन 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी रेणू शर्मानं केली. मागणी पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर लाखो रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला. त्यानंतर पुन्हा रेणू शर्मानं आणखी 5 कोटींच्या ऐवजाची मागणी केली. आपली मागणी पूर्ण केली नाही, तर तुमच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देईन, अशी धमकी रेणू शर्मानं दिल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत या महिलेला 20 एप्रिलला अटक करण्यात आली होती.