AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलं. (dhananjay munde is not my friend says krishna hegde)

धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 2:38 PM

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलं. रेणू शर्मा प्रकरण हे पॉलिटिक्समधील पहिलं मीटू प्रकरण असल्याचा दावाही हेगडे यांनी केला. (dhananjay munde is not my friend says krishna hegde)

रेणू शर्मा हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मुंडे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर मला फारसं भाष्य करायचं नाही. हे केवळ एक प्रकरण नाही. तर हा पॉलिटिक्सचा पहिला मीटू प्रकार आहे, असं हेगडे म्हणाले.

लांबूनच आभार मानतो

मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना 2012मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचं सांगितलंय. त्याबाबत हेगडे यांना विचारले असता, त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, रेणू शर्मा यांनी आपण कृष्णा हेगडे यांचा आदर करत असल्याचं म्हटलं होतं. कृष्णा हेगडे, मनिष धुरी हे दोघे धनंजय मुंडे यांना राजकीय मित्र म्हणून मदत करत असतील. परंतु मी कृष्णा हेगडेंचा आदर करते, ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मी मनिष धुरी यांना माझ्या अडकलेल्या अल्बम संदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे, असं रेणू यांनी सांगितलं.

भुजबळ म्हणाले…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही मुंडे यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंडेंसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. त्यावर मी फारसं बोलणार नाही. फक्त कुणावर अन्याय होऊ नये हे आपलं मत आहे, असं सांगतानाच त्या महिलेविरोधात चार पाच लोकांनी तक्रार केली आहे. यावरून जनतेला काय समजायचं ते समजलं आहे, असं भुजबळ म्हणाले. (dhananjay munde is not my friend says krishna hegde)

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडे ओबीसी नेते, राष्ट्रवादीला काय सूचवायचंय?; भाजपची कोंडी?

मी कुठेही धनंजय मुंडेंच्या पक्षाचा, पदाचा उल्लेख केला नाही, मला कोणाचेही राजकीय करिअर खराब करायचे नाही : रेणू शर्मा

हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा

(dhananjay munde is not my friend says krishna hegde)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.