धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

धारावीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा (Dharavi corona positive patient death) आज रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी
Follow us
| Updated on: Apr 01, 2020 | 11:33 PM

मुंबई : धारावीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा (Dharavi corona positive patient death) आज रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला 23 मार्चपासून सतत ताप येत होता. त्यामुळे 26 मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या रक्त तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा आज रात्री मृत्यू झाला (Dharavi corona positive patient death).

दरम्यान, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सात नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. याशिवाय रुग्ण राहत असलेल्या इमारतीलाही सील करण्यात आलं आहे. धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे आज राज्यात 7 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 6 जण मुंबईचे आहेत. मुंबईत आज दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 340 वर पोहोचला (Dharavi slum area Corona Positive Patient)  आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 340 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 181 पुणे – 38 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 10 नवी मुंबई – 13 अहमदनगर – 8 ठाणे – 8 वसई विरार – 6 यवतमाळ – 4 बुलडाणा – 4 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 340

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 हजार 465 नमुन्यांपैकी 322 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 41 कोरोना बााधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 181 14 13
पुणे (शहर+ग्रामीण) 38 9 1
पिंपरी चिंचवड 12 10
सांगली 25
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 10
नवी मुंबई* 8 1
अहमदनगर 8 1
ठाणे* 8
वसई-विरार* 6
यवतमाळ 4 3
बुलडाणा 4 1
सातारा 2
पनवेल* 2
कोल्हापूर 2
उल्हासनगर * 1
गोंदिया 1
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1 1
रत्नागिरी 1
जळगाव 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 335 41 17

संबंधित बातम्या :

चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप

जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, धारावीत कोरोनाबाधित सापडला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.