जबाबदारी मोठी, पवारसाहेबांचा आशीर्वाद घेतला, आजच चार्ज घेणार : दिलीप वळसे-पाटील
गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. (dilip walse patil meets sharad pawar, will take home ministry charge today)
मुंबई: गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच दुपारी गृहमंत्रीदाचा चार्ज घेणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले, असं राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. (dilip walse patil meets sharad pawar, will take home ministry charge today)
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. वळसे-पाटील यांनी अजून गृहमंत्रीपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली नाहीत. ते आज दुपारी 3 वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज सिल्व्हर ओक निवासस्थानी येऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
पवारांचं मार्गदर्शन घेतलं
मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतलं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली, असं वळसे-पाटील म्हणाले. गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडायला आवडेल, असं सांगतानाच आज दुपारी 3 वाजता गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशमुख दिल्लीत
दरम्यान, गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी कालच दिल्ली गाठली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी होऊ नये म्हणून देशमुख सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिले असून या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून ते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी चर्चा केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोला
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर खोचक टीका केली आहे. चौकशीपासून वाचण्यासाठीच अनिल देशमुखांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली. (dilip walse patil meets sharad pawar, will take home ministry charge today)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 6 April 2021 https://t.co/KiziFo68rW | #SuperFastNews | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले: चंद्रकांत पाटील
रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन
मोठी बातमी: मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड
(dilip walse patil meets sharad pawar, will take home ministry charge today)