वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही; गृहमंत्र्यांचा भाजपला टोला

पालघर साधू हत्याकांडाला एक वर्षे पूर्ण झालं असून साधूंच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही; गृहमंत्र्यांचा भाजपला टोला
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 1:02 PM

मुंबई: पालघर साधू हत्याकांडाला एक वर्षे पूर्ण झालं असून साधूंच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. त्याचा निषेध म्हणून आज भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. कोरोनाचं संकट वाढत आहे. अशावेळी वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी लगावला आहे. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी ही टीका केली. प्रत्येक नेत्याने जबाबदारीने वागलं पाहिजे. आज कोरोनाचा एवढा मोठा संसर्ग असताना वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणं योग्य नाही. जी घटना घडली तिचा तपास होत राहिल. दोषींना शिक्षा होईल, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं. विरोधकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, कोरोना वाढीला मदत करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

पोलिसांवरील ताण वाढला

सरकारने यावेळी घातलेल्या निर्बंधामधून अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर येत असून पोलिसांवरील ताण वाढला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये सर्व बंद होतं. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडू नये. काम असेल तरच घराबाहेर पडा. ही हात जोडून विनंती आहे. आपल्या घरातच राहा आणि सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी केलं.

नागरिकांना अडवण्यासाठी निर्बंध नाही

महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. केवळ नागरिकांना आडवायचं म्हणून निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. तर कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे. ही चेन ब्रेक करायची असेल तर त्यासाठी आपल्याला घरात राहिलं पाहिजे. लोकसंपर्क टाळला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू

आज हॉस्पिटलमध्ये भीषण परिस्थिती आहे. बेड मिळत नाहीत. ऑक्सिन नाही, रेमडेसिवीरही नाही. या सर्व अडचणी प्रशासनासमोर आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी एफडीए आणि पोलीस एकत्र कारवाई करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

संबंधित बातम्या:

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

Corona Cases and Lockdown News LIVE : ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड, एका बेडवर 2-3 रुग्णांवर उपचार सुरु

कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी

(dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.