मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं कारण काय?

मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही शाब्दिक चकमक एका बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या बीएमसीत ओपन स्पेस पॉलिसीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं कारण काय?
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 5:42 PM

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 1 डिसेंबर 2023 : मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमुळे चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री मंगलप्रभात लोढे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीत आपल्याला बोलू दिलं जात नाही, भूमिका मांडू दिली जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. हा वाद शिगेला पोहोचला. त्यानंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलेली. मुंबईच्या बीएमसीत ओपन स्पेस पॉलिसीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे गैरहजर होते. या बैठकीत आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप करत काँग्रेसचे माजी नगरसेवक बाहेर पडले. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

काँग्रेस नेत्यांचा नेमका आरोप काय?

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर चांगलाच हल्लाबोल केला. चर्चेत आमचे मुद्दे मांडायला वेळ दिला नाही. आमचे मुद्दे ऐकून घेतले नाही. आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. भाजपच्या नगसेवकांना झुकतं माप दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या बैठकीबाबत काँग्रेस माजी नगरसेवकांना कोणतीच माहिती दिली नसल्याचादेखील आरोप करण्यात आला. मंत्री पॉलिसी बनवायला बैठक कशी घेऊ शकतात? एका पक्षाचे आमदार महापालिकेची पॉलिसी बनवाणार का? असे सवाल काँग्रेस नेत्यांनी केला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.