इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे काम मुदतीत पूर्ण करा; धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे काम मुदतीत पूर्ण करा; धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश
Dhananjay Munde
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 6:37 PM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले आहेत. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल, अशी माहितीदेखील मुंडे यांनी आज दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा धनंजय मुंडे यांच्या दालनात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. (Dr. Babasaheb Ambedkar memorial at Indu Mill Build quickly, Orders of Dhananjay Munde)

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मुळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

वास्तुशास्त्रविशारदांनी गुणवत्तापूर्ण कामावर भर द्यावा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. या स्मारकाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. हे लक्षात घेवून काम दर्जेदार व्हावे, यासाठी संबधितानी लक्ष द्यावे. तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर.श्रीनिवास यांनी कामांची सद्यस्थिती संदर्भात माहिती दिली. प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेंट वाहनतळ, स्मारक इमारत आणि पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित 48 टक्के काण पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबतही सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मारकाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारक इमारत फाऊंडेशनची सद्यस्थिती सचित्र माहितीसह यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.

इतर बातम्या

सोलापूरचे पालकमंत्री बदलणार का? जयंत पाटील म्हणतात..

धनगर आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही, धनगर आरक्षण कृती समितीचा इशारा

(Dr. Babasaheb Ambedkar memorial at Indu Mill Build quickly, Orders of Dhananjay Munde)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.