AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime | महिलांनी नको ‘त्या’ ठिकाणी लपवलं कोकेन, पोलिसांनी लावला डोक्याला हात

डीआरआयने मुंबई विमानतळावर आज मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने ड्रग्ज तस्करी प्रकरणी तीन परदेशी महिलांना अटक केलीय. या महिलांकडे तब्बल साडेपाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग्ज आढळले आहेत. विशेष म्हणजे आरोपी महिलांनी नको त्या ठिकाणी ड्रग्ज लपवलं होतं.

Mumbai Crime | महिलांनी नको 'त्या' ठिकाणी लपवलं कोकेन, पोलिसांनी लावला डोक्याला हात
| Updated on: Oct 13, 2023 | 7:04 PM
Share

ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे. मुंबई पोलिसांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी 300 कोटींचं ड्रग्ज तप्त केलं होतं. त्यामुळे ड्रग्ज तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले होते. पोलीस आणि इतर यंत्रणांकडून सातत्याने ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई सुरु आहे. पण तरीही ड्रग्ज तस्कर त्यातून धडा शिकताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे ते वेगवेगळी शक्कल लढवून नको ते कृत्य करत आहेत. यामध्ये महिला तस्करांचादेखील समावेश आहे. आतादेखील तसाच प्रकार समोर आलाय. या महिला तस्करांनी तस्करीची तर परिसीमाच गाठलीय. कारण त्यांनी ज्या ठिकाणी कोकेन लपवलं होतं ते समोर आल्यानंतर पोलिसांनीदेखील स्वत:च्या डोक्याला हात लावला.

गुन्हेगार कोणत्या थराला पोहोचतील, काय करतील, चोरी कशी लपवतील, याचा काहीच भरोसा नाही. मुंबई विमानतळावर समोर आलेला आजचा प्रकार तसाच आहे. आरोपी महिला या विदेशातून आल्या होत्या. त्यांच्याकडे तब्बल 5 कोटी 68 लाख रुपयांचं कोकेन मिळालं आहे. विशेष म्हणजे या आरोपी महिलांनी नको त्या ठिकाणी कोकेन लपवलं होतं.

आपण अशाप्रकारे ड्रग्ज लपवलं तर आपलं कृत्य पकडलं जाणार नाही, असं आरोपी महिलांना वाटलं होतं. पण डीआरआयने आरोपी महिलांचं कृत्य हेरत त्यांना अटक केलीय. विशेष म्हणजे महिलांनी अशाप्रकारे लपवून ड्रग्जची तस्करी करणं हा प्रकार पहिल्यांदा घडलाय. याआधी देखील पोलिसांनी तस्कारांना अटक केलीय. पण सध्याचं प्रकरण वेगळं आहे.

568 ग्रॅम कोकेन जप्त

मुंबई विमानतळावरून 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने तीनही परदेशी महिलांना अटक केली आहे. आरोपी महिलांकडून सॅनिटरी पॅड आणि गुदद्वारातून कोकेनची तस्करी केली जात होती, अशी धक्कादायक माहिती उघड झालीय. डीआरआयकडून 568 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. आरोपींमध्ये दोन युगांडा देशाच्या महिला आणि एका टांझानियन महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युगांडाच्या आरोपी महिलांनी सॅनिटरी पॅडमध्ये कोकेन लपवलं होतं. तर टांझानियन महिला गुदद्वारातून कोकेनची तस्करी करताना पकडली गेलीय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना कोर्टाकडून न्यायालीन कोठडी सुनावण्यात आलीय. डीआरआय याप्रकरणी सविस्तर तपास करत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.