ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर वक्रदृष्टी; मोठ्या अ‍ॅक्शनची शक्यता

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी आरोग्याच्या विषयावर बोलताना महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्यावर भाष्य केलं होतं.

ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर वक्रदृष्टी; मोठ्या अ‍ॅक्शनची शक्यता
Ex-mayor kishori pednekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 2:00 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या, प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील संकट काही कमी होताना दिसत नाहीये. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे किशारी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची चौफेर कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किशोरी पेडणेकरांवरील आरोपांची ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती मागवली होती. आता ईडीकडून पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी आर्थिक गुन्हे शाखेनेही पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हे सुद्धा वाचा

अव्वाच्या सव्वा दरात बॉडी बॅगची खरेदी

किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी वेदांता कंपनीकडून लाच घेतल्याचं सांगितलं जातं. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग 1300 रुपयांना होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून ही एक बॅग 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली. स्वत:च्याच वेदांता इनोटेकला पेडणेकर यांनी कंत्राट दिल्याची तक्रार आहे. पेडणेकर यांनी अधिकाराचा गैरवापर करत हा घोटाळा केला होता. या घोटाळा होत असताना त्याला काही पालिका अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर कारवाईला वेग

दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी आरोग्याच्या विषयावर बोलताना महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्यावर भाष्य केलं होतं. महापालिकेत कोव्हिड काळात घोटाळा झाला होता. अव्वाच्या सव्वा दरात बॉडी बॅग्ज खरेदी करण्यात आल्या होत्या.

300 रुपयांची बॉडी बॅग्स 6 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. लोक मरत असताना हे लोक पैसे जमवत होते. यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किशोरी पेडणेकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.