हसन मुश्रीफ चौथ्यांदा ईडी कार्यालयात, तब्बल साडे सात तास चौकशी, नेमकं काय-काय घडलं?

हसन मुश्रीफ यांची आज तब्बस साडे सात तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर दिल्याचं मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ चौथ्यांदा ईडी कार्यालयात, तब्बल साडे सात तास चौकशी, नेमकं काय-काय घडलं?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:14 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आज चौथ्यांदा ईडी (ED) कार्यालयात गेले. त्यांची जवळपास साडे सात तास चौकशी करण्यात आली. हसन मुश्रीफ सलग साडे सात तासांच्या विस्तृत चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपण ईडीला चौकशीत सहकार्य केलं. ईडी अधिकाऱ्यांचा कोणताही प्रश्न टाळला नाही, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी चौकशीनंतर दिली.

“मला पुन्हा बोलावलं तर मी पुन्हा येईल, असं त्यांना मी सांगितलं. त्यांना तपासात अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. मी त्यांचे कोणतेही प्रश्न टाळले नाहीत. योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. मला ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काल इथे हजार पेक्षा जास्त लोकं आमचं स्टेटमेंट घ्या, आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही, हे सांगण्यासाठी आले होते. ईडी अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि त्यांनी दिलेली कागदपत्रे जमा करुन घेतली, असं ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं”, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

“मी आज चौथ्यानंदा आलो. तीन दिवस माझं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. मी सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. माझं आज स्टेटमेंट पूर्ण झालं आहे. तपासात मी त्यांना संपूर्णपणे सहकार्य करतोय. त्यांना गरज लागली तर मी पुन्हा येईल असं त्यांना कळवलंय. मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलाय. न्यायालय आपल्यासाठी चांगला निर्णय देईल कारण आज माझा वाढदिवस आहे”, असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

हसन मुश्रीफ यांचे सीएची देखील ईडी चौकशी

विशेष म्हणजे फक्त हसन मुश्रीफ यांचीच नाही तर त्यांचे सीए महेश गुरव यांचीही आज ईडी चौकशी झाली. गुरव सकाळपासून ईडी कार्यालयात होते. महेश गुरव यांना चौकशीनंतर जाऊ देण्यात आलं. महेश गुरव यांना अटकेपासून कोणतंही संरक्षण नाही. गुरव यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. त्यावर सुनावणी सुरू आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.