Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर का घेणार नाही? एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कारण

"ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही", असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय.

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर का घेणार नाही? एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कारण
eknath shinde and uddhav thackeray
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 8:28 PM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीच चर्चेत असतो. पण शिवसेना पक्षात सध्या फूट पडलीय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटांकडून मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानावर मेळावा होईल, असा दावा केला जात होता. अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. शिंदे गट आझाद मैदानात दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आज ट्विटरवर सविस्तर भूमिका मांडलीय. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा देखील साधलाय.

“बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दसरा मेळावा शिवतीर्थावर का घेणार नाही? एकनाथ शिंदे म्हणाले…

“बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. पण, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

“बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....