एकनाथ शिंदे अपात्र होतच नाही, तेच मुख्यमंत्री राहतील – देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis Exclusive : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. एकनाथ शिंदे हे अपात्र ठरु शकत नाहीत. असं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांना सोबत का घेतलं याबाबत ही त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे अपात्र होतच नाही, तेच मुख्यमंत्री राहतील - देवेंद्र फडणवीस
devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 6:31 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज टीव्ही ९ मराठीला स्फोटक मुलाखत दिली. शुक्रवारी मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांना राजकीय परिस्थिती माहितीये. आमचा संवाद ही इतका चांगला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोकांनी याचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. इशारा हा व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. सरकार व्यवस्थित चालले आहे. अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे.

अजित पवार यांना सोबत का घेतलं?

अजित पवार आमच्यासोबत शंभर टक्के कन्फर्टेबल आहेत. सरकार स्थिर होतं. राजकारणात शक्ती वाढवावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत २०१९ ला ही येणार होती. त्यांना आमच्यासोबत यायचं होतं.

एकनाथ शिंदे डिस्कॉलीफाय होतच नाही – फडणवीस

एकनाथ शिंदे डिस्कॉलीफाय होतच नाही. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.

अजित दादांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यांना आधीच सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित दादा हे मॅच्युअर राजकारणी आहेत.

राष्ट्रवादीचे जी लोकं आले आहेत त्यांच्यावर कुठलीही चौकशी नाहीये. उद्धव ठाकरे सरकार इतके नाकर्ते होते की त्यांना माहित होतं आपण परत निवडून येणार नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत आले.

सदावर्ते यांच्याबद्दल काय म्हणाले फडणवीस?

सदावर्ते हा फडणवीसाचा माणूस आहे असा आरोप होतो. शरद पवार यांची वाचलेली राष्ट्रवादी हा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिले होतं. ते वैध उच्चन्यायालयाने ठरवलं होतं. सदावर्ते म्हणाले होते की, फडणवीस यांच्याकडून मला धोका आहे. फडणवीस कोर्टावर दबाव टाकतात. असं ते म्हणतात. अनेक आरोप त्यांनी माझ्यावर केलेत. संघाच्या विरोधात बोलले. सातत्याने त्यांच्या भूमिका बदलतात. मी त्यांना फक्त दोन वेळा भेटलोय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.