नोकरी करत असलेल्या महिलेलाही पोटगीचा हक्क, मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट, महिला सुशिक्षित आहे म्हणून तिच्यावर नोकरीची सक्ती नको

प्रकरणात पती पत्नी यांचा विवाह २०१० साली झाला होता. २०१३ सालापासून ही पत्नी तिच्या मुलीसह वेगळी राहु लागली. एप्रिल २०१३ साली या महिलेने आपल्या पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि पोटगीची मागणी केली होती.

नोकरी करत असलेल्या महिलेलाही पोटगीचा हक्क, मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट, महिला सुशिक्षित आहे म्हणून तिच्यावर नोकरीची सक्ती नको
Mumbai High court Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 8:00 PM

मुंबई- महिला पदवीधर आहे, (Educated Woman)याचा अर्थ तिने नोकरी (compulsion of Job) करायलाच हवी, असा होत नाही, असे मुंबई हायकोर्टाने शनिवारी स्पष्ट केले आहे. जर महिला सुशिक्षित आहे, याचा अर्थ तिने नोकरीच करायला हवी, असा होत नाही, ती घरीही राहू शकते, असे मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High court)न्यायाधीश भारती डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नोकरी करते म्हणून पोटगीची तिची मागणी मान्य करता येणार नाही, असे होऊ शकत नाही, असेही मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण

पुण्यातल्या एका फॅमिली कोर्टाच्या प्रकरणी पुनरावलोकन याचिका हायकोर्टात करण्यात आली होती. या प्रकरणात पतीने, आपल्या पत्नीच्या उपजीविकेचा खर्च म्हणजेच पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. या पत्नीचे स्थिर उत्पन्न असतानाही असे आदेश देण्यात आले होते.

नोकरी करायची की नाही, हा महिलेचा अधिकार

या प्रकरणात सुनावणीवेळी, या पतीचे वकील अभिजीत सरवटे यांनी युक्तिवाद केला होता की, पत्नी नोकरीला असतानाही तिला उदरनिर्वाहासाठी पैसे देण्याचा आदेश चुकीचा आहे. यावर न्यायाधीश भारती डोंगरे यांनी सांगितले की, आपल्या समाजात आत्तापर्यंत हे स्वीकारार्ह नाही की घरातील महिेलेला आर्थिक योगदान देणे अनिवार्य आहे. नोकरी करणे न करणे हा महिलेचा अधिकार आहे. यावेळी न्यायाधीशांनी वकिलांना असेही विचारले की, मी आज न्यायाधीश आहे, उद्या मी घरी बसले, तर तुम्ही असे म्हणाल का, की तुम्ही न्यायाधीश होण्याच्या योग्यतेच्या आहात, तुम्ही घरी बसू नका.

हे सुद्धा वाचा

पत्नीने पोटगी मागितली होती.

या संबंधित प्रकरणात पती पत्नी यांचा विवाह २०१० साली झाला होता. २०१३ सालापासून ही पत्नी तिच्या मुलीसह वेगळी राहु लागली. एप्रिल २०१३ साली या महिलेने आपल्या पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि पोटगीची मागणी केली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.