गाडीवर बसवला लाल दिवा, अनेक ठिकाणी टाकल्या खोट्या धाडी, मग कसे अडकले चौघे जाळ्यात

एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना कारवाईची धमकी देत खंडणी वसूल केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल एक नाही तर चार जणांचे पथक खोट्या धाडी टाकून लोकांकडून खंडणी वसूल करण्याचा धंदा करत होते. अखेर चौघे पोलिसांच्या जाळ्यात आले.

गाडीवर बसवला लाल दिवा, अनेक ठिकाणी टाकल्या खोट्या धाडी, मग कसे अडकले चौघे जाळ्यात
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 1:32 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : सध्या अनेकांनी तोतया अधिकारी बनण्याचा सपाटाच सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत गुजरातमधील एक जण जाळ्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची फसवणूक करणाऱ्या त्या ठगाला Z-Plus सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली होती. त्याला बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी दिली गेली होती. त्याच्या राहण्यासाठी 5 स्टार हॉटेलची सुविधा केली गेली होती. मग त्या पठ्याने टॉप अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होता. तसेच त्याने SDM रँकच्या अधिकाऱ्यासोबत नियंत्रण रेषेचा (LOC) अनेक वेळा दौरा केला होता. आता असेच तोतया अधिकाऱ्यांचे एक प्रकरण समोर आले आहे. हे अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (Narcotics Control Bureau)अधिकारी असल्याचे सांगून खंडणी वसूल करत होते.

काय केला प्रकार

हे सुद्धा वाचा

एनसीबीचे अधिकारी सांगून लोकांना कारवाईची धमकी देत खंडणी वसूल केली जात असल्याचा प्रकार अकोला पोलिसांनी उघड केला. एनसीबीचे तोतया अधिकारी बनून फिरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आलीय. मुंबई एनसीबी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असल्याचं सांगत आरोपी वावरत होते. आरोपी नदीमशाह दिवाण हा स्वतःला एनसीबीचा उपसंचालक असल्याचं सांगत फिरत होता.

गाडीवर लावला भारत सरकारचा बोर्ड

स्वतःच्या कारवर या आरोपींनी भारत सरकार तसेच एनसीबी उपसंचालक असा बोर्ड लावला होता.त्यानंतर गाडीवर आरोपींनी चक्क लाल दिवा बसवून अनेक ठिकाणी खोट्या धाडी टाकल्या होत्या. अकोला पोलिसांना त्यांची माहिती मिळली. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली आणि हा प्रकार उघडकीस झाला.अकोला पोलिसांनी मुंबई एनसीबी कार्यालयात संपर्क साधला असता असे कोणतेही अधिकारी नसल्याचं एनसीबीने स्पष्ट झाले. अकोल्यातील दहीहंडा पोलीसानी आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.

कोण आहेत आरोपी

अटक केलेल्या आरोपींमध्ये नदीम शाह दिवाण,ऐयाझ शेख,असिफ शाह आणि मोहीम शेख यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून अनेक बनावट शिक्के, खोटी कागदपत्र, बनावट ओळखपत्र आणि इतर मुद्देमाल हस्तगत केलाय.आरोपी वापरत असलेली कारगाडीही पोलिसांनी जप्त केलीय.

किती जणांकडे टाकल्या धाडी

नदीम शाह दिवाण,ऐयाझ शेख,असिफ शाह आणि मोहीम शेख यांचा हा उद्योग अनेक दिवसांपासून सुरु होता. त्यांनी किती जणांना फसवले, हे आता पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातमी बनावट अधिकाऱ्यास Z-Plus सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी अन् 5 स्टार हॉटेलची सुविधा..वाचा सविस्तर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.