Ganpat Gaikwad Firing | आमदार गणपत गायकवाड अडचणीत, आणखी एक गुन्हा दाखल

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणात गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी एक गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे.

Ganpat Gaikwad Firing | आमदार गणपत गायकवाड अडचणीत, आणखी एक गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 1:51 PM

सुनील जाधव, ठाणे, दि.4 फेब्रुवारी 2024 | भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाने शनिवारी सर्वात गंभीर रुप घेतले. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शेतकऱ्यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

का दाखल झाला ॲट्रॉसिटीचा गुन्हा

आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजेता जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोपी शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे तक्रारीत

नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाउंड करण्याचे काम सुरु केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिविगाळ केली. तुम्ही तुमच्या जमिनीकरीता कोणत्याही कोर्टामध्ये जा, आम्ही ते घेऊ.

हे सुद्धा वाचा

गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव गणपत गायकवाड यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र पोलिसांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अखेर गणपत गायकवाड यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. गणपत गायकवाड यांना कोर्टात आणण्यात येणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.