AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पूजा करताना कपड्यांना पेट, मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू

के. नलिनाक्षन बुधवारी सकाळी राहत्या घरी देवपूजा करत होते, त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते 80 ते 90 टक्के भाजले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

घरात पूजा करताना कपड्यांना पेट, मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:29 AM

मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचे निधन झाले. घरात पूजा करताना कपडे पेटल्यामुळे नलिनाक्षन गंभीररित्या भाजले होते. मात्र भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 79 वर्षांचे होते. (Former BMC chief K Nalinakshan dies from severe burns dhoti caught fire while performing pooja)

के. नलिनाक्षन बुधवारी सकाळी राहत्या घरी पूजा करत होते, त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते 80 ते 90 टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नेमकं काय घडलं?

चर्चगेटमधील ‘ए’ मार्गावरील शार्लीविले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. “बाबा कधीच पूजेची संधी चुकवत नसत. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पूजा करत होते. यावेळी जळत्या कापरामुळे त्यांच्या लुंगीने पेट घेतला. माझी आई आणि मोलकरीण त्यावेळी घरी होत्या, मात्र बाबांची खोली आतून बंद असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही.” अशी माहिती त्यांचे पुत्र श्रीजित यांनी दिली.

उपचारादरम्यान निधन

“देवपूजेच्या खोलीचे दार तोडून आत जाईपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यांनी पट्टाही लावलेला असल्याने लुंगी सोडवणं शक्य होत नव्हतं. त्यांना आम्ही तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली” असंही त्यांच्या मुलाने सांगितलं. नलिनाक्षन यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कोण होते के. नलिनाक्षन?

मूळ केरळातील कोझीकोडचे असलेले के. नलिनाक्षन हे 1967 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारीपदही भूषवले आहे. 1999 ते 2001 या काळात मुंबई महापालिकेचे आयुक्तपद सांभाळले होते. त्यानंतर त्यांच्याकडे महसूल, वाहतूक यासारख्या अन्य विभागांतील अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या भुयारी मार्गाचे कामही नलिनाक्षन यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

लग्नात जेवणाच्या गरम कढईत आचारी पडला, 25 वर्षीय तरुणाचा भाजून मृत्यू

प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू

Former BMC chief K Nalinakshan dies from severe burns dhoti caught fire while performing pooja

'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.