राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. (Free Covid vaccination will not start from 1st may in Maharashtra, says rajesh tope)
मुंबई: राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Free Covid vaccination will not start from 1st may in Maharashtra, says rajesh tope)
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
अपॉईंटमेंट सक्तीची
लसीकरण करण्यासाठी कोविन अॅपवरून अपॉईंटमेंट घेणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही. उठून कोणीही लसीकरणासाठी येईल असं होणार नाही. त्यासाठी कोविन अॅपवर तुम्हाला नोंदणी करावीच लागेल. केंद्र सरकारचे तसे आदेशच आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये, असंही ते म्हणाले.
2 कोटी डोस विकत घ्यावे लागणार
राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात 5 कोटी 71 लाख लोक 18 ते 44 वयोगटातील आहेत. त्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. शंभर टक्के लोकांना फ्रि लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागणार आहेत. एका लसीसाठी 400 रुपये आकारले जातात. त्यानुसार 2 कोटी डोससाठी अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचे म्हटलं तर 12 कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला 2 कोटी डोस द्यावे लागणार आहेत. आमच्या आरोग्य विभागाच्या 13 हजार संस्था असून त्यांच्या माध्यमाधून दिवसाला 13 लाख डोस देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.
फक्त 1 लाख डोस मिळत आहेत
राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. त्यामुळे सर्वांचंच लसीकरण होणं शक्य नाही, असं सांगतानाच राज्याकडे फक्त दीड लाख व्हॅक्सीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोणत्या कोणत्या लस घेणार
कोव्हॅक्सि उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात प्रत्येकी 10 लाख डोस मिळणार आहे. जुलैनंतर ते 20 लाख डोस देणार आहेत. कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळणार आहे. कंपनीने तसं तोंडी आश्वासन दिलं आहे. तसेच रशियाची लस योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच ऑगस्ट दरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरूच
यावेळी टोपे यांनी 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरूच राहील असं स्पष्ट केलं. या लसीकरणात कोणतीही बाधा येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (Free Covid vaccination will not start from 1st may in Maharashtra, says rajesh tope)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/YcLyBq9LBx
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
संबंधित बातम्या:
Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
VIDEO: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं लावावी?
(Free Covid vaccination will not start from 1st may in Maharashtra, says rajesh tope)