नवी मुंबईच्या कंटेन्मेंट झोनमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेची घरपोच गाडी
नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरुन बाप्पाच्या मूर्तीचं संकलन करणार आहे (Ganesh Murti collection vehicle for Ganpati Visarjan).
नवी मुंबई : राज्यात आज (23 ऑगस्ट) दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरुन बाप्पाच्या मूर्तीचं संकलन करणार आहे. त्यानंतर गणेश मूर्तींचं महापालिकेच्या स्वयंसेवकांकडून विधीवत विसर्जन केलं जाणार आहे (Ganesh Murti collection vehicle for Ganpati Visarjan).
गणपती बाप्पाच्या विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून 23 मुख्य विसर्जन तलावांच्या जोडीला 135 कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या गाड्या कंटेन्मेंट झोन भागात फिरुन विसर्जनासाठी मूर्ती संकलित करणार आहेत (Ganesh Murti collection vehicle for Ganpati Visarjan).
दरम्यान, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच गर्दी टाळण्याच्यादृष्टीने विसर्जनापूर्वीची निरोपाची आरती घरीच करुन आपल्या गणेशमूर्ती महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात, असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.
“गणेशोत्सवाचा उत्साह कायम राखून प्रत्येक नागरिकाने आरोग्यभान राखावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध सोयीसुविधांचा लाभ घ्यावा. आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योद्ध्याची भूमिका साकारावी”, असंदेखील आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
Ganesh Visarjan | राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, थेट समुद्रात विसर्जन करण्यास मनाई
पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था