कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यावर्षीही 27 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी, पासेस-स्टिकर्स आवश्यक, कुठे मिळणार?

दिनांक 27 ऑगस्ट ते दिनांक 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. 66) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. शासन निर्णयात हे मार्ग नमूद करण्यात आले आहेत.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यावर्षीही 27 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी, पासेस-स्टिकर्स आवश्यक, कुठे मिळणार?
गणेशभक्तांसाठी टोलमाफीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 5:32 PM

मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात (Kokan)जाणाऱ्या गणेशभक्तांना (Ganesh Devotees)याही वर्षी पथकर(टोल) माफी (toll free)देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार दि. 27 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या आणि गणेशोत्सवानंतर परत येणाऱ्या भाविकांनाही या टोलमाफीचा लाभ घेता येणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयीा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कुठल्या कुठल्या रस्त्यांवर टोलमाफी

दिनांक 27 ऑगस्ट ते दिनांक 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. 66) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. शासन निर्णयात हे मार्ग नमूद करण्यात आले आहेत.

टोलमाफीसाठी स्टीकर्स आवश्यक

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास आवश्यक असणार आहे. या पासवर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत. या विभागांनी परस्परात समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये हे पास उपलब्ध करुन द्यावेत. असे आदेशही देण्यात आले आहेत. ज्यांना कोकणात जाण्यासाठी टोलमाफी हवी असेल त्यांना या ठिकाणी जाऊन ते पासेस घ्यावे लागणार आहेत. हेच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचनाही सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

  1. पासेस, स्टिकर्स पोलीस आणि परिवहन विभागाकडे उपलब्ध
  2.  मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी
  3. पीडीब्ल्यूडीच्या टोलनाक्यांवरही टोलमाफी
  4. 27 ऑगस्टपासून ते 11 सप्टेंबरपर्य़ंत टोलमाफी
  5. “गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन असे स्टिकर्स मिळणार
  6. पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये स्टिकर्स देणार
  7. सदरचाच पास परतीच्या मार्गासाठी वापरता येणार

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.