Ganpati Special Train : कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांचा तिकीट दर वाढला, चाकरमान्यांचे बजेट कोलमडणार
तर गणपती स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप, उधना ते गोवा दरम्यान 4 ट्रिप, अहमदाबाद ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप आणि विश्वामित्री ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप चालवणार आहे.
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotshav) जवळ आला की, मुंबईत (Mumbai) राहणारे भाविक मोठ्या संख्येने आपापल्या गावाकडे जात असतात. हे पाहता भारतीय रेल्वे (Indian Railway) दरवर्षी अधिक गणपती स्पेशल ट्रेन चालवते. याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणपतीच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने कोकणासाठी ६ जोडी विशेष गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच एकूण 266 गाड्या चालवण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी गावाला गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या तिकीट दरात तीस टक्के वाढ करण्यात आली आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात गणपती सणासाठी चाकरमान्यांना गावी जाता आलं नव्हतं. परंतु यंदा तिकीटाचा दर वाढल्याने चाकरमान्यांचे बजेट कोलमडणार एव्हढं मात्र नक्की.
मुंबई सेंट्रल ते मडगाव जंक्शन मार्गावर 34 फेऱ्या असतील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने कोकणासाठी विशेष रेल्वेच्या 60 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून धावतील. मुंबई सेंट्रल ते कोकण दरम्यान 6 फेऱ्या होणार असून पहिली 23 आणि 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसेच, मुंबई सेंट्रल ते मडगाव जंक्शन मार्गावर 34 फेऱ्या असतील. जी 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या गाड्यांचे आरक्षण १८ जुलैपासून सुरू होणार आहे.
तर गणपती स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप, उधना ते गोवा दरम्यान 4 ट्रिप, अहमदाबाद ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप आणि विश्वामित्री ते कुडाळ दरम्यान 6 ट्रिप चालवणार आहे. या गाड्यांचे आरक्षण १८ जुलैपासून सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत रेल्वे वेबसाइटवर प्रवाशांना या गाड्यांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. गेल्या आठवड्यातच मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त आणखी 60 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान या गाड्या धावतील. या सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.