Election Programme : राज्यात 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, 18 सप्टेंबरला मतदान, थेट सरपंच पदाचाही समावेश

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल.

Election Programme : राज्यात 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, 18 सप्टेंबरला मतदान, थेट सरपंच पदाचाही समावेश
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 8:17 PM

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम (Election Programme) जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters) उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) देण्यात आले आहेत.

मतमोजणी 19 सप्टेंबरला

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवगांच्या जागा देव आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

नंदुरबार : शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळे : शिरपूर- 33. जळगाव : चोपडा- 11 व यावल- 2. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 1, संग्रामपूर-1, नांदुरा- 1. चिखली- 3 व लोणार- 2. अकोला : अकोट- 7 व बाळापूर 1. वाशीम : कारंजा- 4. अमरावती : धारणी- 1, तिवसा- 4, अमरावती- 1 व चांदुर रेल्वे- 1. यवतमाळ : बाभुळगाव- 2, कळंब- 2. यवतमाळ- 3, महागाव- 1, आर्णी- 4, घाटंजी 6, केळापूर 25. राळेगाव- 11, मोरेगाव- 11 व झरी जामणी- 8. नांदेड : माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 1, मुदखेड – 3, नायगाव (खेरगाव)- 4, लोहा- 5. कंधार- 4. मुखेड- 5, व देगलूर- 1. हिंगोली : (औंढा नागनाथ)- 6. परभणी: जिंतूर- 1 व पालम- 4. नाशिक: कळवण- 22. दिंडोरी- 50 व नाशिक 17. पुणे: जुन्नर- 38. आंबेगाव- 18, खेड- 5 व भोर- 2. अहमदनगर: अकोले- 45. लातूर: अहमदपूर 1. साताराः वाई- 1 व सातारा- 8. कोल्हापूर: कागल- 1.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.