सोन्याची कोट्यवधींची तस्करी, दोन सोने व्यापाऱ्यांना मुंबईत अटक

gold smuggling : महसूल गुप्तचर संचालनालयाला मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने सोन्याची कोट्यवधींची तस्करी करणारे रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणी दोन सोने व्यापाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यांकडून सोने व रोकड जप्त केली आहे.

सोन्याची कोट्यवधींची तस्करी, दोन सोने व्यापाऱ्यांना मुंबईत अटक
gold smuggling
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 2:29 PM

मुंबई : मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाला मोठे यश मिळाले आहे. डीआरआय पथकाने मुंबईतील मोठी सोन्याची तस्करी उघडकीस आणली आहे. या पथकाने छापा टाकून पिता-पुत्रास अटक केली आहे. या व्यावसायिकाकडून तब्बल 23 कोटी रुपयांचे 37 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे सोने व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. या पिता-पुत्राने तस्करी करुन इतके सोने मिळवले कसे? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

डीआरआयच्या पथकाची कारवाई

मुंबई डीआरआयच्या पथकाने गुरुवारी झवेरी बाजार येथील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून 23 कोटी रुपयांच्या 37 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन सोने व्यापाऱ्यांना अटक केली आहे. गुप्तचर महसूल संचालनालयाने सोने तस्करी रॅकेटचा भाग असल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राला अटक केली आहे. ही अटक कस्टम कायद्यान्वये करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

यांच्यांवर झाली कारवाई

सूरज भोसले ( 23 ), धर्मराज भोसले ( 52 ) या पित्रा पुत्रावर ही कारवाई झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने दोघांनाही डीआरआयच्या कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

gold smuggling

महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच ‘डीआरआय’ हे केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचा भाग आहे. याच मंडळांतर्गत सीमा शुल्काची चोरी करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे काम करते. डीआयआरची देशभरात १२ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यातील एक कार्यालय मुंबईत आहे. या कार्यालयांतर्गत चार प्रादेशिक कार्यालये आहेत. त्यात नागपूर, पुणे व गोव्याचा समावेश आहे.

अशी सापडली लिंक

गेल्या महिन्यात डीआरआयने प्रशांत माईणकर याला अटक केली होती. तो आखाती देशातून प्रवाशांकडून तस्करी केलेले सोने वितळवत होता. काळबादेवी येथे ही सुविधा त्याला भोसले यांनी उपलब्ध करुन दिली होती. जानेवारी महिन्यात ३.५ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या तपास डीआरआय करत होते. त्यावेळी हे मोठे रॅकेट सापडले. आता काळबादेवी येथील कार्यालयावर छापा टाकून २१ कोटी रुपये किमतीचे ३५ किलो सोने जप्त केले होते. तसेच 2.3 कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.