मुंबई ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी Good News! लवकरच सुरू होणार जलवाहतूक

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई ते नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी आता वाहतुकीचं नवीन साधन सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी Good News! लवकरच सुरू होणार जलवाहतूक
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 1:26 PM

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे लोकल अद्यापही बंद आहे. अशात मुंबईकरांना प्रवासाची मोठी चिंता आहे. पण या दरम्यान, मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई ते नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी आता वाहतुकीचं नवीन साधन सुरू करण्यात आलं आहे. (Good news mumbai new mumbai water transport will start soon)

येत्या काही महिन्यात मुंबईहून जलवाहतूक (Water Transport) सुरू होणार आहे. यंदा हा जलमार्ग बेलापूरमधील प्रिंसेस डॉकपासून मुंबईपर्यंत सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते चार महिन्यांत मेरीटाइम इंडिया समिट पार पडणार आहे. ज्यामध्ये भारत आणि परदेशातील अनेक कंपन्या भाग घेत आहेत. कोरोनामुळे, यावेळी ती व्हर्च्युअल समिट होणार आहे.

जलवाहतूक प्रकल्पाची तयारी पूर्ण

मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरांना जोडणार्‍या जलवाहतूक प्रकल्पासंदर्भात राजीव जलोटा म्हणाले की, या प्रकल्पाची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली असून काही किरकोळ कामं शिल्लक आहेत. तीही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. काही महिन्यांत मुंबई ते नवी मुंबई शहर जलमार्गाने जोडलं जाईल.

मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर हा पहिला जलमार्ग सुरू करणार आहे. त्यांनी सांगितले की वाशी, नेरूळ, ऐरोली आणि ठाण्यातील गोड माकड इथं थांबा देण्यात येणार आहे. मुंबई-बेलापूर जलमार्गाला एका तासामध्ये मुंबईहून नवी मुंबई पोहोचता येणार आहे. रोरो आणि रोपेक्स नवी मुंबईप्रमाणेच येत्या 1 वर्षात मुंबईपासून काशिद, रेवस, कारंजा आणि जेएनपीटीपर्यंत जलमार्ग सुरू केले जातील.

वाहतुकीचा मार्ग सोपा, स्थानिक गर्दीही होईल कमी

रोरोमधील सर्व लहान जहाजांमधून मोठ्या ट्रकमध्ये वाहतूक केली जाते. प्रवासी आणि वाहनं दोघेही रोपेक्समध्ये प्रवास करू शकतात. सध्या जेएनपीटीमध्ये रोरो जेट्टी तयार करण्याचं काम सुरू आहे. हे काम येत्या 2 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक पाण्याच्या वाहतुकही जेएनपीटीत वळवता येईल. यामुळे पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे या रस्त्यांवर होणारी रहदारी मोठ्या प्रमाणात कमी होईल. इतकंच नाही तर मुंबई लोकलची गर्दीही कमी होईल. यामुळे मुंबईकरांचा मोठा वेळ वाचणार आहे. (Good news mumbai new mumbai water transport will start soon)

संबंधित बातम्या – 

Maharashtra coronavirus updates : पोहरादेवी गडावरील महंतासह कुटुंबातील चौघांना कोरोना

शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा

आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली, मुख्यमंत्री-राठोड भेटीचा इतिवृत्तांत

(Good news mumbai new mumbai water transport will start soon)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.