VIDEO: जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार; गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका

मंडल आयोगासाठीचा लढा दलितांनी लढला. ओबीसी या लढ्यात मागे होते, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

VIDEO: जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार; गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका
gopichand padalkar
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 11:50 AM

मुंबई: मंडल आयोगासाठीचा लढा दलितांनी लढला. ओबीसी या लढ्यात मागे होते, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा सवाल पडळकर यांनी आव्हाड यांना केला.

ओबीसींना निवडून आणणार का?

वेळ पडली तर प्रशासक नेमू… म्हणजे आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू आहे. एवढंच जर प्रेम असेल तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या आणि निवडून आणणार का?, असं आव्हानच त्यांनी आघाडीला दिलं आहे.

ते काय करताहेत कुणालाच माहीत नाही

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. ओबीसीला आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व आणि फसवी आहे. मागचं दीड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलीय. आताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला?

राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

मंडल आंदोलनात ओबीसी नव्हतेच, भाजपने राजकारण करू नये; बबनराव तायवाडे यांनी केलं आव्हाडांचं समर्थन

Nitesh Rane: नितेश राणेंना तूर्तास अटक नाही, शुक्रवारी अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

Aurangabad: लाखोंचे कॅमेरे घेऊन निघालेला फोटोग्राफर गायब, भावाची तर वेगळीच तक्रार, पोलिसांसमोर आव्हान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.