कुठे डिजेच्या तालावर ठेका, कुठे गाण्यांची मैफल, तर कुठे फटाक्यांची आतषबाजी; असं झालं 2023चं जल्लोषात स्वागत

मुंबईजवळच्या माथेरानमध्ये 'थर्टी फर्स्ट'चं सेलिब्रेशनला दणक्यात करण्यात आलं. माथेरानमध्ये हॉटेलचालकांनी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

कुठे डिजेच्या तालावर ठेका, कुठे गाण्यांची मैफल, तर कुठे फटाक्यांची आतषबाजी; असं झालं 2023चं जल्लोषात स्वागत
कुठे डिजेच्या तालावर ठेका, कुठे गाण्यांची मैफल, तर कुठे फटाक्यांची आतषबाजीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 7:22 AM

मुंबई: कुठे पेल्यावर पेले रिचवले… कुठे डिजेच्या तालावर ठेका धरला… कुठे केक कापले गेले तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली… सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि आनंद ओसंडून वाहत होता.

मुंबईत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत झालं. रात्रीच्या 12 च्या ठोक्याला ‘हॅपी न्यू इयर’चा एकच जयघोष सर्वांच्या तोंडी होता. जे झालं ते झालं. आता नवी सुरुवात, नवे संकल्प, नव्या आशांना मनात रुंजी घालून जो तो नव्या वर्षांच्या जल्लोषमय रात्री न्हावून गेला होता.

हे सुद्धा वाचा

सर्वत्र ओसंडून वाहणार्‍या जल्लोषाने शहरं बहरून गेली होती. कुठे हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत, तर कुठे डीजेच्या ठेक्यावर बेधूंद होऊन, तर कुठे ‘एकच प्याला’ रिचवतं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.

हा संपूर्ण नजारा दादरच्या चौपाटीवरनं पाहण्यासाठी प्रमाणात मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. रात्री 12 वाजता चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. दादरच नव्हे तर गिरगाव, जुहू, मढ, मार्वे आणि मुंबईसह राज्यातील चौपाट्या आणि समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. शहरात होणाऱ्या आतिषबाजी पाहत हॅप्पी न्यू इयर बोलत एकामेकांना शुभेच्छा देत असल्याचे चित्र चौपाटी परिसरात दिसून आले.

मुंबईजवळच्या माथेरानमध्ये ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशनला दणक्यात करण्यात आलं. माथेरानमध्ये हॉटेलचालकांनी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. अनेक हॉटेल्समध्ये डीजे पार्ट्या पार पडल्या. या पार्ट्यांमध्ये पर्यटक जल्लोष करताना दिसले.

देशाच्या प्रमुख शहरांमध्ये या वर्षीच्या अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. संमिश्र आठवणींनी भरलेल्या या वर्षाला सूर्याच्या साथीने अखेरचा निरोप देण्यासाठी मुबंईतील अनेक चौपाट्या पर्यटकांनी फुलून गेल्या होत्या.

मुंबईतील सर्व चौपाट्या आणि कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांमुळे गजबजून गेले होते. दोन वर्षापासून कोरोनाचे सावट होते. त्यातून सुटका झाल्यानंतर राज्यातील नागरिक पहिल्यांदाच मोठ्या संख्येने बाहेर पडले.

यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे पर्यटकांनी व मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात चौपाटी परिसरामध्ये यावर्षीचा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी केल्याने चौपाटी परिसर फुलून गेला होता.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.